संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ येथे उद्या कापसाबाबत राष्ट्रीय परिषद

यवतमाळ   ः बीटी बियाणे, बोंड अळी प्रादुर्भाव, कीटकनाशक फवारणीदरम्यान विषबाधा या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.१०) दुपारी ११ ते सायंकाळी पाच या वेळात  दारव्हा मार्गावरील (कै.) दादासाहेब कोल्हे सभागृहात ही परिषद होईल. ‘कपाशीचे चक्रव्यूव्ह’ अशी संकल्पना या परिषदेची असून परिषदेला शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक देवानंद पवार यांनी केले आहे.

नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था व यवतमाळ येथील शेतकरी न्यायहक्‍क आंदोलन समिती यांच्या संयुक्‍त सहकार्याने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी नेते, तसेच माजी खासदार नाना पटोले यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होईल. परिषदेच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहर नाईक असतील.

प्रमुख पाहुणे म्हणून (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, प्रगतिशील शेतकरी वामनराव कासावार, गुलाबराव गावंडे, ‘सकाळ’चे विदर्भ आवृत्ती संपादक शैलेश पांडे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, रघुनाथ पांडे, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे, पॅन इंडिया हैदराबादचे डॉ. डी. नरसिंहा रेड्डी, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी कीटकशास्त्रज्ञ डॉ. टी. व्ही. कठाणे, भाभा संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. शरद पवार, प्रा. मिलिंद राऊत, बसवेश्‍वर घोडकी, सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. शालीग्राम वानखडे, डॉ. व्ही. एस. नगरारे, पॅन इंडिया केरळचे संशोधक समन्वयक दिलीप कुमार, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, कृषी सभापती शाम जयस्वाल, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील उपस्थित राहणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com