Agriculture News in Marathi National level sugar industry quality awards announced | Page 2 ||| Agrowon

राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील गुणवत्ता पारितोषिके जाहीर

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देशातील साखर कारखान्यांना देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये राज्यातील कारखान्यांनी मोहोर उठविली आहे.

कोल्हापूर : नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देशातील साखर कारखान्यांना देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये राज्यातील कारखान्यांनी मोहोर उठविली आहे. राज्याला १० पारितोषिके मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून, त्यांना चार पारितोषिके प्राप्त झाली आहेत. गुजरात, हरियाना व तमिळनाडूने प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली आहेत. मध्य प्रदेशाला एक मिळाले आहे. 

यंदाच्या वर्षाचे संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., सोलापूर यांना मिळाले आहे. उच्च उतारा विभागात अति उत्कृष्ट साखर कारखाना म्हणून कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात येणार आहे.
विक्रमी ऊस गाळपात हुपरीच्या (जि. कोल्हापूर) जवाहर, तर उत्कृष्ट ऊस उत्पादकतेत शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याने पहिला क्रमांक मिळवला. यंदाच्या (२०२१) वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशातून १०८ सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. त्यात महाराष्ट्र (४६), उत्तर प्रदेश (१३), तमिळनाडू (११), हरियाना (१०), गुजरात (१०), पंजाब (९) कर्नाटक (७) आणि मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश (प्रत्येकी एक) कारखाने सहभागी झाले होते. 

संस्थेमार्फत दर वर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते व त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वांत जास्त साखरनिर्यात, अशा विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे वर्ष २०२१साठीची निश्‍चित केलेली एकूण २१ पारितोषिके राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी जाहीर केली. या प्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.  

दांडेगावकर म्हणाले, ‘‘पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ६३ सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता. उर्वरित (सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी उतारा) राज्यांचा दुसरा गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ४५ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच ‘एका कारखान्याला एक पारितोषिक’ असे धोरण ठरविण्यात आले.’’

गट १ 
उच्च उतारा विभाग 
उत्कृष्ट ऊस उत्पादकता : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ, जि. कोल्हापूर, राजारामबापू पाटील, स. सा. का., सांगली
तांत्रिक कार्यक्षमता 
उच्च उतारा विभाग : विघ्नहर स. सा. का., पुणे, डॉ. पतंगराव कदम सोनहिरा स. सा. का., सांगली.
उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन   
उच्च उतारा विभाग : श्री नर्मदा खाण्ड उद्योग मंडळी लि. गुजरात, श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी लि. बारडोली, गुजरात.
विक्रमी ऊस गाळप
जवाहर शेतकरी स. सा. का., कोल्हापूर
विक्रमी ऊस उतारा
अजिंक्यतारा स.सा.का., सातारा 
अति उत्कृष्ट साखर कारखाना 
उच्च उतारा विभाग ः श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल, कोल्हापूर.
विक्रमी साखर निर्यात : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि., पिंपळनेर. सह्याद्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., सोलापूर. 
गट २
उर्वरित विभाग
उत्कृष्ट ऊस उत्पादकता : दि कैथल सहकारी साखर कारखाना, हरियाना
किसान शेतकरी चिनी मिल्स लि., नाजीबाबाद, उत्तर प्रदेश
तांत्रिक कार्यक्षमता
दि शहाबाद सहकारी चिनी मिल्स, हरियाना
दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. साथिऑन, आझमगड, उत्तर प्रदेश
उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन
डी. एस. सुब्रमण्या शिवा सहकारी साखर मिल्स लि. तमिळनाडू
श्री नवलसिंग सहकारी शक्कर कारखाना मर्यादित, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश
विक्रमी ऊसगाळप
रामाला सहकारी चिनी मिल्स लि., उत्तर प्रदेश
विक्रमी ऊस उतारा
दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. गजरौला, उत्तर प्रदेश
अति उत्कृष्ट साखर कारखाना
कल्लाकुरीची सहकारी साखर मिल्स, तमिळनाडू

 


इतर बातम्या
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
सोलापूर जिल्ह्यातील एकरावरील फळबागा...सोलापूर, केम : करमाळा तालुक्‍यातील केम,...
 पीकविम्याची रक्कम जमा होण्यास प्रारंभ बुलडाणा ः जिल्ह्यात गेल्या काळात अतिवृष्टीने...
सहा वर्षांत अडीच हजारांवर  शेतकरी...अमरावती ः शेतकरी आत्महत्येनंतर त्यांच्या...