agriculture news in Marathi, The National Lok Sabha's special focus is on the South Lok Sabha | Agrowon

‘राष्ट्रवादी’चे खास लक्ष नगर दक्षिण लोकसभेकडे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 जानेवारी 2019

नगर : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यासह राज्याचे लक्ष असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादीने लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण नगर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुरुवार (ता. ३१) व शुक्रवार (ता. १) या दिवशी निर्धार परिवर्तनाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते नगर जिल्ह्यामध्ये दोन दिवस असणार आहेत. 

नगर : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यासह राज्याचे लक्ष असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादीने लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण नगर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुरुवार (ता. ३१) व शुक्रवार (ता. १) या दिवशी निर्धार परिवर्तनाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते नगर जिल्ह्यामध्ये दोन दिवस असणार आहेत. 

निर्धार परिवर्तन मेळाव्याबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मंगळवारी (ता. २९) माहिती दिली. युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संध्या सोनवणे, सोमनाथ धूत आदी उपस्थित होते. 

फाळके म्हणाले, ‘‘रायगडावरून सुरू झालेली राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्धार परिवर्तनाचा यात्रा करमाळ्यावरून (जि. सोलापूर) गुरुवारी नगर जिल्ह्यात दाखल होईल. या यात्रेनिमित्त कर्जत, पारनेर, पाथर्डी व नगर तालुक्‍यातील बायजाबाई जेऊर येथील सभा होणार आहेत. या सभांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. श्रीगोंदे येथील नुकतीच निवडणूक झाल्यामुळे तेथे सभा घेण्यात आलेली नाही. 

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे इच्छुक उमेदवार खूप आहेत. उमेदवार कोण हा ठरविण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींचा आहे. शरद पवार यांची आज्ञा हीच माझी इच्छा असल्याने त्यांचा आदेश असल्यास मी निवडणूक लढेल. पारनेर येथील सभेत शिवसेनेचे कार्यकर्ते निलेश लंके हे त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. लंके यांच्या पक्षप्रवेशामुळे पारनेर तालुक्‍यात बेरजेचे राजकारण होईल. पक्षापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे कुणी समजण्याचे कारण नाही. कुणीही याबाबत जर तर वर चर्चा करू नये, असे फाळके यांनी स्पष्ट केले.

नगर दक्षिणचा इतिहास 
आघाडीचे महाराष्ट्रातील जागावाटप अजून अंतिम झालेले नाही. काही जणांकडून जागा वाटपाबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा गेल्या काही निवडणुकीतील इतिहास सांगतो की कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केल्यास दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होतो. या भांडणात अपक्ष उमेदवार मात्र कधीही निवडून आलेला नाही, असे सूचक विधान फाळके यांनी केले.


इतर बातम्या
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू...सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...