वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळेस प्रारंभ

वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळेस प्रारंभ
वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळेस प्रारंभ

औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५) शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १८ जानेवारी २०१९ या कालावधीत औरंगाबाद येथे होणाऱ्या नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेच्या निमित्ताने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काहींना आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेत आपल्या अनुभव व यशाच्या सादरीकरणाची संधी मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाना, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार आदी राज्यांतील २०० शेतकरी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये इतर राज्यांतील जवळपास ११० व महाराष्ट्रातील ८० ते ९० शेतकऱ्यांचा समावेश असेल. १५ जानेवारीला सकाळी ८.३० वाजता शेतकरी आणि निमंत्रितांची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर उद्‌घाटन सत्राला सुरवात होईल.  परिषदेविषयी माहिती देतांना श्री. सिंगला आणि श्री. गोयल सुरवातीला वाल्मीचे प्रमुख दीपक सिंगला कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विषद करतील. जिल्हाधिकारी उदय चौधरी, सीडब्ल्यूसीचे संचालक आणि आयएनसीएसडब्ल्यू नवी दिल्लीचे सचिव अनुज कनवाल, एमओडब्ल्यूआर नवी दिल्लीचे संचालक गिरीज गोयल आदी प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन होईल. त्यानंतर आयसीआयडीचे अध्यक्ष इंजी. फेलिक्‍स रिंडर्स यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाने कार्यशाळेच्या उद्‌घाटन सत्राचा समारोप होईल.  तांत्रिक सत्र सकाळी १०.३० वाजता दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एस. मगर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यामध्ये राहुरी कृषी विद्यापिठाचे सहयोगी डीन डॉ. डी. डी. पवार, सहायक प्राध्यापक एम. वाय. खडतरे, सहयोगी प्राध्यापक डॉ. हरीश देशपांडे सहभागी होतील. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात एमडब्ल्यूआरआरएचे सचीव डॉ. एस. ए. कुलकर्णी, राहुरी कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सुनील गोरंटीवार आदींचे मार्गदर्शन होणार आहे.  १२.३० ते १ या वेळेत एकूणच विषयावर चर्चासत्र व त्यानंतर दुपारी कडवंची पाणलोट क्षेत्रास भेट आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने सहभागी शेतकऱ्यांना या विषयाचे महत्त्व व त्यामधील अडीअडचणीबाबतही ऊहापोह केला जाणार आहे.  ४२ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग परिषदेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध राज्यांच्या जलसंधारण खात्यांचे मंत्रीही सहभागी होणार आहेत. ४२ देशांच्या प्रतिनिधींनी नावनोंदणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com