agriculture news in marathi, National Micro Irrigation conference starts in WALMI | Page 2 ||| Agrowon

वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळेस प्रारंभ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जानेवारी 2019

औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५) शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १८ जानेवारी २०१९ या कालावधीत औरंगाबाद येथे होणाऱ्या नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेच्या निमित्ताने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काहींना आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेत आपल्या अनुभव व यशाच्या सादरीकरणाची संधी मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५) शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १८ जानेवारी २०१९ या कालावधीत औरंगाबाद येथे होणाऱ्या नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेच्या निमित्ताने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काहींना आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेत आपल्या अनुभव व यशाच्या सादरीकरणाची संधी मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाना, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार आदी राज्यांतील २०० शेतकरी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये इतर राज्यांतील जवळपास ११० व महाराष्ट्रातील ८० ते ९० शेतकऱ्यांचा समावेश असेल. १५ जानेवारीला सकाळी ८.३० वाजता शेतकरी आणि निमंत्रितांची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर उद्‌घाटन सत्राला सुरवात होईल. 

परिषदेविषयी माहिती देतांना श्री. सिंगला आणि श्री. गोयल

सुरवातीला वाल्मीचे प्रमुख दीपक सिंगला कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विषद करतील. जिल्हाधिकारी उदय चौधरी, सीडब्ल्यूसीचे संचालक आणि आयएनसीएसडब्ल्यू नवी दिल्लीचे सचिव अनुज कनवाल, एमओडब्ल्यूआर नवी दिल्लीचे संचालक गिरीज गोयल आदी प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन होईल. त्यानंतर आयसीआयडीचे अध्यक्ष इंजी. फेलिक्‍स रिंडर्स यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाने कार्यशाळेच्या उद्‌घाटन सत्राचा समारोप होईल. 

तांत्रिक सत्र सकाळी १०.३० वाजता दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एस. मगर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यामध्ये राहुरी कृषी विद्यापिठाचे सहयोगी डीन डॉ. डी. डी. पवार, सहायक प्राध्यापक एम. वाय. खडतरे, सहयोगी प्राध्यापक डॉ. हरीश देशपांडे सहभागी होतील. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात एमडब्ल्यूआरआरएचे सचीव डॉ. एस. ए. कुलकर्णी, राहुरी कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सुनील गोरंटीवार आदींचे मार्गदर्शन होणार आहे. 

१२.३० ते १ या वेळेत एकूणच विषयावर चर्चासत्र व त्यानंतर दुपारी कडवंची पाणलोट क्षेत्रास भेट आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने सहभागी शेतकऱ्यांना या विषयाचे महत्त्व व त्यामधील अडीअडचणीबाबतही ऊहापोह केला जाणार आहे. 

४२ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग
परिषदेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध राज्यांच्या जलसंधारण खात्यांचे मंत्रीही सहभागी होणार आहेत. ४२ देशांच्या प्रतिनिधींनी नावनोंदणी केली आहे.


इतर अॅग्रो विशेष
कोकणात पावसाचा जोर वाढणार पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी...
`कृषी’चे प्रवेश सीईटीनेच होणार पुणे: राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
शेती शाश्वत अन् आश्वासकही!चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता...
दूध दराचे दुखणेइतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने...
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...
दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ...चंद्रपूर: ‘एचएमटी’सह तब्बल ९ धानाचे वाण विकसित...
सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला...अयोध्या : राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली...
पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ...
राज्यात ९ ऑगस्टला रानभाज्या महोत्सवमुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री...
अमृत आहार योजनेंतर्गत मोफत दूध भुकटी...मुंबई : राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर...
प्रयोगशीलतेला प्रयत्नवादाची जोड फळबाग...पुणे जिल्ह्यात धालेवाडी (ता. पुरंदर) येथील संदीप...
बारमाही भाजीपाला शेतीतून आर्थिक बळकटीमेहू (जि.जळगाव) येथील अनिल अर्जून पाटील यांनी २१...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...