agriculture news in marathi, Nationalist Congress party state executive meet today in pune, Rashtrawadi | Agrowon

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काेण? आज निर्णय
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 एप्रिल 2018

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काेणाची वर्णी लागणार यावर आज (रविवारी, ता. २९) शिक्कामाेर्तब हाेणार आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा असून, पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपला राेखण्यासाठी जयंत पाटील यांच्या नावावर माेहाेर उमटण्याची शक्यता अधिक आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काेणाची वर्णी लागणार यावर आज (रविवारी, ता. २९) शिक्कामाेर्तब हाेणार आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा असून, पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपला राेखण्यासाठी जयंत पाटील यांच्या नावावर माेहाेर उमटण्याची शक्यता अधिक आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची कार्यकारिणी बैठक आणि सर्वसाधारण सभा दुपारी १ वाजता मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात हाेणार आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचा ९ वर्षांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या सर्वसाधारण सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील असणार असून, बैठकीला विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यासह सर्व माजी मंत्री, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या सभेमध्ये पक्षाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष शरद पवार विद्यमान राजकीय घडामाेडींवर भाष्य करणार आहेत. तसेच आगामी लाेकसभा व विधानसभा निवडणुकांसाठीचे मार्गदर्शनदेखील करणार आहेत, अशी माहिती प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबराेबरच विविध जिल्हा, तालुका आणि शहराध्यक्ष यांच्याबराेबरच विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यादेखील जाहीर करण्यात येणार आहेत.

प्रभाकर देशमुख यांच्यावर विशेष जबाबदारी
माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यावर सातारा जिल्ह्याची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. देशमुख हे शरद पवार यांच्या अतिशय जवळचे समजले जातात. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी विशेष काैतुक करत राजकीय वाटचालीची दिशा दिली हाेती. या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्यावर विशेष जबाबदारी देण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या गाेटातून व्यक्त हाेत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...