यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीककर्ज वितरणात पिछाडल्या

यवतमाळ ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. परंतु यावेळी राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या पीककर्ज वितरणातील असहकार्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांची पीककर्ज वितरणाची टक्‍केवारी अवघी ११ टक्के इतकीच आहे.
Nationalized banks lag behind in crop loan disbursement in Yavatmal district

यावर्षीच्या हंगामासाठी आत्तापर्यंत ३२० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप झाले आहे. त्यात जिल्ह्यात बॅंकेचा वाटा २१६ कोटींचा असून कर्ज वितरणाची टक्‍केवारी ३९ इतकी आहे. शासनाने यावर्षी जिल्हा बॅंकेला ५४८ कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य दिले आहे. सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांना १५०० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. परंतु बॅंकाकडून कर्ज वितरणाला गती मिळाली नसल्याने आजवर अवघे १०४ कोटी रुपयांचेच कर्ज वितरित होऊ शकले. पीककर्जाची ही टक्‍केवारी ८ ते ११ अशी आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राष्ट्रीयीकृत बॅंका कर्ज वितरणात पिछाडल्याची स्थिती आहे.

भाजप सरकारमधील कर्जमाफी नाही तत्कालनी भाजप सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली होती. दीड लाखांपर्यंतची माफी हवी असल्यास त्यावरील रक्‍कम भरण्याचे सांगण्यात आले होते. या योजनेच्या लाभापासून जिल्हा बॅंकेचे ३० हजार शेतकरी वंचित आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com