agriculture news in Marathi nationwide band today Maharashtra | Page 2 ||| Agrowon

किसान मोर्चाची आज देशव्यापी ‘बंद’ची हाक 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 मार्च 2021

नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने आज (ता. २६) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

पुणे ः नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने आज (ता. २६) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असून, विविध संस्था, संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. 

केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायदे, प्रस्तावित वीजबिल कायदा रद्द करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी दिल्लीच्या विविध सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी चार महिने पूर्ण होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने बंदचे आवाहन केले असून, त्याला आघाडीतील घटक पक्षांसह देशभरातील अनेक पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा किसान सभेने केला आहे. याशिवाय होळीच्या दिवशी या कायद्यांची होळी करण्यात येणार आहे. या दिवशी गावागावांत प्रस्तावित बिलांची होळी करण्याचे आवाहन किसान सभेने केले आहे. 

दरम्यान, भारत बंदला काँग्रेस पक्ष सक्रिय पाठिंबा देत राज्यभर उपोषण करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. तर भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या काळ्या कृषी कायद्याविरोधात गेल्या १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस देशातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. यामध्ये आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शिवाय गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याने या ‘बंद’चे समर्थन करणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. 

बाजार समित्या सुरू राहणार 
भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समित्या सुरू राहणार असल्याचे पुणे, नाशिक, मुंबई बाजार समित्यांमधील संघटनांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...