देशी गायींचे होणार संशोधन आणि संवर्धन

देशी गायींचे होणार संशोधन आणि संवर्धन
देशी गायींचे होणार संशोधन आणि संवर्धन

पुणे ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि मेरठ येथील राष्ट्रीय गो-संशोधन संस्था यांच्यामध्ये शिक्षण, संशोधन व विस्तारासाठी सामंजस्य करार पुणे कृषी महाविद्यालयात नुकताच करण्यात आला. 

या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, राष्ट्रीय गो-संशोधन संस्थेचे संचालक डॉ. नितीन पाटील, महात्मा फुले विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील मासाळकर, पशुविज्ञान व दुग्धजन्य विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत फुलपगारे, प्रा. डॉ. शिवाजी पाचपुते, डॉ. भानुदास पवार, डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. उल्हास गायकवाड, डॉ. सोमनाथ माने आदी उपस्थित होते.  

राष्ट्रीय गोसंशोधन संस्थेचे संचालक डॉ. नितीन पाटील म्हणाले की, ‘‘राष्ट्रीय गो-संशोधन संस्थेने देशी गायीच्या जातीचे संवर्धन करणे यावर प्रामुख्याने भर देण्याचे ठरविले आहे.’’

भारतीय कृषीमध्ये गोपालनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दुग्धोत्पादनातून मिळणारे उत्पन्न हे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यास सहायक ठरत आहे. या सामंजस्य करारामुळे पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन यामध्ये विद्यार्थी आणि संशोधक यांच्यासाठी गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी मदत होईल. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले की, ‘‘महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे महाराष्ट्रातील गोपालन व दुग्धोत्पादनामध्ये मोठे योगदान आहे. त्यासाठी लागणाऱ्या चाऱ्यामध्ये आफ्रिकन टॉल, फुले जयवंत, फुले गुणवंत, आरएल ८८ यांसारख्या विद्यापीठाच्या चारापिकांच्या वाणांमुळे महाराष्ट्रातील दूध उत्पादन वाढीमध्ये मोठी भर पडली. याशिवाय हरितक्रांतीच्या काळात अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होताना, संकरित वाणाचा पुरस्कार करीत असताना आपण देशी वाणांकडे दुर्लक्ष केले. यामुळे देशातील जैविक विविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. याचप्रमाणे आपण देशी गोधन विकासाकडेही दुर्लक्ष केले आहे. सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये पिकांचे देशी वाण व पशूच्या देशी प्रजातीच्या संवर्धनाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आवश्यकता असून, भविष्यामध्ये हेच वाण व प्रजाती आपणास तारक ठरणार आहे.’’

या वेळी डॉ. बाळासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. शिवाजी पाचपुते यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com