Agriculture news in marathi Natural Industry Group To Create Sanitizer: Thombre | Agrowon

नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार सॅनिटायझरचे उत्पादन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याने प्रति दिन दहा हजार लिटर सॅनिटायझरचे उत्पादन लवकरच नॅचरल उद्योग समूह करणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी दिली.

शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याने प्रति दिन दहा हजार लिटर सॅनिटायझरचे उत्पादन लवकरच नॅचरल उद्योग समूह करणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी दिली.

सध्या ‘कोरोना’च्या गंभीर परिस्थितीत हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरची गरज आहे. सॅनिटायझरची बाजारात कमतरता जाणवत होती. बाजारातून ग्राहकांना मुबलक प्रमाणात व योग्य दरात सॅनिटायझर मिळावे. या उद्देशाने राज्य सरकारने सॅनिटायझरचे उत्पादन करण्याची परवानगी दिली आहे. 

औरंगाबाद विभागाचे अन्न व औषधी विभागाचे आयुक्त संजय काळे, राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप, अधीक्षक केशव राऊत यांनी याबाबतचा परवाना दिला असून ‘आसवानी’ प्रकल्पाच्या माध्यमातून आधूनिक यंत्रणेच्या माध्यमातून व सॅनिटायझर उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करुन लवकरच उत्पादन करण्यात येणार आहे. प्रारंभी अर्धा, एक, दोन, पाच लिटर तसेच दोनशे लिटरचे पॅकिंग बाजारात उपलब्ध होईल, अशी ही माहिती अध्यक्ष श्री. ठोंबरे यांनी दिली.

‘अँडलर्स बायो एनर्जी’ तयार करणार सॅनिटायझर ः सचिन वैद्य
गौरगांव (ता. कळंब) येथील ‘अँडलर्स बायो एनर्जी’ प्रतिदिन दोन हजार लिटर सॅनिटायझरचे उत्पादन करणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक सचिन वैद्य यांनी दिली. सॅनिटायझर उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करुन लवकरच प्रतीदिन दोन हजार लिटर सॅनिटायझर उत्पादन करण्यात येणार आहे. प्रारंभी नव्वद मिली, दोनशे मिली, अर्धा लिटर तसेच एक लिटरचे पँकिंगमध्ये बाजारात उपलब्ध होईल. कारखान्याचे अध्यक्ष सदानंद बापट यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुर होणार असल्याची माहिती श्री. वैद्य यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...