जमीन उफाळल्याने हुमणी मृतावस्थेत बाहेर

गेल्या काही वर्षांत आपण पाहिले तर मुसळधार किंवा प्रचंड पाऊस काही भागांत अजिबात झालेलाच नव्हता. यंदाच्या वर्षी तसा पाऊस झाला. पाणी सर्वत्र तुंबून राहिले. अशा पावसात होलोट्रिकिया प्रजातीची हुमणी टिकू शकत नाही, त्यामुळेच तिचे नैसर्गिक नियंत्रण होताना दिसते आहे. ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. अशा वेळी रासायनिक उपायांपेक्षा अशा नैसर्गिक उपायांचाच वापर महत्त्वाचा ठरतो. - डॉ. पांडुरंग मोहिते, ज्येष्ठ कीटकशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर
जमीन उफाळल्याने हुमणी मृतावस्थेत बाहेर
जमीन उफाळल्याने हुमणी मृतावस्थेत बाहेर

विंग, जि. सातारा ः तालुक्‍यात संततधार पावसामुळे जमीनदेखील आता उफाळली आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने त्याचा हुमणी किडीवर परिणाम झाला असून, मृतावस्थेत ती बाहेर आली आहे. ठिकठिकाणी शेतात असंख्य स्वरूपात ती आढळून येत आहे. उत्पादकाची ती डोकेदुखी ठरली होती. मात्र, आता किडीपासून होणारे पिकाचे नुकसान टळणार असल्याची चर्चा आता उत्पादकांत सुरू आहे.  मागील दोन वर्षांपासून हुमणी किडीचा प्रादुर्भाव विंगसह संपूर्ण तालुक्‍यातच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संपूर्ण शिवार किडीला बळी पडून मोठे नुकसान झाले होते. उसासह भुईमूग, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांना लक्ष्य केले होते. शेतकरी त्यामुळे हवालदिल झाले होते. कीड नियंत्रणासाठी अनेक उपायोजना शेतकऱ्यांनी हाती घेतल्या खऱ्या. मात्र, फारसा परिणाम जाणवत नव्हता. त्यामुळे डोकेदुखी वाढली होती.  संततधार पावसाने किडीवर नियंत्रण आणल्याची उत्पादकांत मोठी चर्चा आहे. ठिकठिकाणी पाणी साचून राहिले असून, जमिनीही उफाळल्या आहेत. त्यामुळे ही कीड पाण्याच्या उफाळ्याबरोबर बाहेर आली आहे. असंख्य स्वरूपात शेतात ती ठिकठिकाणी तरंगताना दिसत आहे. प्रवाहासोबत ती ठिकठिकाणी वाहूनही गेली आहे. मृतावस्थेत तरंगणाऱ्या किडीवर आता पक्ष्यांनी लक्ष्य केले आहे. हुमणी अळी ही तिच्या त्वचेद्वारे श्‍वसन करते, त्यामुळे अधिक पाण्यामध्ये श्‍वसन करण्यात अडथळे येऊन त्या मृत झाल्या असाव्यात, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे. यातून काही प्रमाणात का होईना नुकसान टळेल, असे उत्पादकांतून बोलले जात असून, समाधान समाधान व्यक्त होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com