प्रकाशफुलांनी चकाकले भंडारदऱ्यातील तारांगण...

अकोले, जि. नगर : मोसमी पावसाचे आगमन होताच शनिवारी (ता.१३) सह्याद्रीच्या डोंगररांगेतील झाडांवर लक्ष्य लक्ष्य काजवे प्रकाशमय झाल्याने परिसररोमांचित झाले आहेत.
प्रकाशफुलांनी चकाकली भंडारदऱ्यातील निसर्गरात्र...
प्रकाशफुलांनी चकाकली भंडारदऱ्यातील निसर्गरात्र...

अकोले, जि. नगर : मोसमी पावसाचे आगमन होताच शनिवारी (ता.१३) सह्याद्रीच्या डोंगररांगेतील झाडांवर लक्ष्य लक्ष्य काजवे प्रकाशमय झाल्याने पथदर्शी रोमांचित झाले आहेत. निसर्गाचे हे अवर्णनीय दृश्य रात्रीच्या काळोख्यात अत्यंत सुंदर आहे. काजव्यांची प्रजनन क्रिया सुरू झाल्याने हिरव्या वनराईने प्रकाश फुलांची जणू चादर पांघरली की काय असे मनमोहक चित्र पाहायला मिळत आहे...

भंडारदरा परिसरातील निसर्ग ऋतुमानानुसार बदलत असतो. पावसाळ्यातील जलोस्तव, ऑक्टोबर-नोव्हेंबर मधील फुलोतस्व आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात भंडारदरा-घाटघर-कळसूबाई परिसरातील हजारो झाडांवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुतखेल, कोलटेंभे भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुळा परिसरात पाचनई, कुमशेत, शिरपुंजे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अदभूत खेळ ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना ‘वस्ती’ असते, ती झाडे ‘ख्रिसमस ट्री’सारखी दिसू लागली आहे. see video : https://twitter.com/AGROWON/status/1271852618025857024

झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर लक्ष लक्ष काजवे बसलेले. लुकलुकत होणारी काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना सुखावून जातात. कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गवैभव आपण पाहतच राहतो आणि पाहता-पाहाता भान हरपून जातो डोंगर. दरवर्षी दऱ्याखोऱ्यांतील रस्ते, टेकड्या पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात असतात. निसर्गाचे हा मनोहारी आविष्कार डोळ्यात साठविण्यासाठी मुंबई, ठाणे, नगर, नाशिक, पुणे या व अन्य जिल्ह्यातून पर्यटक येथे गर्दी करत असतात. मात्र या वर्षी कोरोना महामारी संकटामुळे वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना येण्यास बंदी घातली आहे, कळसूबाई अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी डी .डी. पडवळ यांनी सर्व नाके बंद करून बंदोबस्त वाढविला आहे पर्यटक अथवा अज्ञात व्यक्ती दिसला तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे श्री. पडवळ यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com