आजपासून नवरात्रोत्सव; कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा यंदाही नाही

यंदा नऊ दिवसच उत्सव रंगणार असून, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. जोतिबा व अंबाबाई मंदिर भाविकांसाठी खुले होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे.
आजपासून नवरात्रोत्सव; कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा यंदाही नाही
आजपासून नवरात्रोत्सव; कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा यंदाही नाही

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवार (ता. ७)पासून येथे प्रारंभ होणार आहे. यंदा नऊ दिवसच उत्सव रंगणार असून, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. जोतिबा व अंबाबाई मंदिर भाविकांसाठी खुले होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाइन बुकिंग आवश्यक असून, त्यासाठीच्या लिंक खुल्या झाल्या आहेत. दसऱ्याच्या दिवशी दसरा चौकात होणारा शाही दसरा सोहळा यंदाही रद्द केला असल्याची माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.  दरम्यान, सार्वजनिक मंडळेही साध्या पद्धतीनेच उत्सव साजरा करणार आहेत. मिरवणुकांसह रास-दांडिया कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने कमीत कमी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मूर्ती प्रतिष्ठापना करण्यावर भर दिला जाईल. गुरुवारी (ता. ७) घरोघरी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. रविवारी (ता. १०) ललिता पंचमीचा सोहळा असेल. यानिमित्त होणारी त्र्यंबोली यात्रा यंदाही रद्द केली आहे. अंबाबाईची पालखी वाहनातूनच टेंबलाई देवीच्या भेटीसाठी जाईल. मंगळवारी (ता. १२) जोतिबाचा जागर होणार आहे. बुधवारी (ता. १३) अंबाबाईचा जागर होणार असून, रात्री साडेनऊला अंबाबाईचे वाहन वाहनातूनच नगरप्रदक्षिणेला बाहेर पडणार आहे.  ७ ते १५ ऑक्टोबरपर्यंत (१४ ऑक्टोबर वगळता) पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत दर्शन सुरू राहील. १४ ऑक्टोबरला सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत दर्शन सुरू राहील. प्रतितास ७०० भाविकांना दर्शन असेल. प्रत्येकाला मास्क बंधनकारक असेल. दहा वर्षांखालील व ६५ वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती महिला, आजारी व्यक्तींना मंदिरात प्रवेश नसेल. अंबाबाई व जोतिबा दर्शनासाठी अनुक्रमे www.mahalaxmikolhapur.com आणि www.shreejyotiba.com या संकेतस्थळांवर ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ई-दर्शन पाससाठी आधारकार्ड नंबर, ई-मेल ॲड्रेस व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. एका वेळेला एका व्यक्तीसोबत कुटुंबातील जास्तीत जास्त तीन सदस्यांची नोंदणी करून ई-पास काढता येईल. बुकिंग झाल्यावर मोबाईल व मेलच्या माध्यमातून पीडीएफ स्वरूपात ई-पास क्यूआर कोडसह भाविकांना मिळेल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com