नवरात्रीत केळीचे खांब, पाने ठरली उत्पन्नाचा स्रोत
नवरात्रीत केळीचे खांब, पाने ठरली उत्पन्नाचा स्रोत

नवरात्रीत केळीचे खांब, पाने ठरली उत्पन्नाचा स्रोत

यवतमाळ ः उन्हाळ्यामुळे विक्रमी दरात केळीची विक्री झाली. त्यानंतर आता केळीचे पिल (खांब) आणि पानांना देखील उत्सवकाळात मागणी वाढली आहे. पानांचा पत्रावळी म्हणून तर केळी पिलाचा वापर पूजेसाठी होतो. पांढरकवडा तालुक्‍यातील शेतकरी एक हजार रुपये प्रती ट्रक या प्रमाणे नागपूरला याचा पुरवठा करीत आहेत.

यवतमाळ जिल्हा कापसासाठी प्रसिद्ध आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणाच्या सीमेवर असलेला पांढकरवडा तालुक्‍यात मात्र व्यवसायिक पीक पद्धतीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्यामध्ये भाजीपाल्यासोबतच परंपरागत केळी पिकाचा देखील समावेश आहे. खैरगाव देशमुख येथील प्रकाश पुप्पलवार यांची सुमारे अडीच एकरावर केळी लागवड आहे. जून, जुलैत केळीचे घड कापणीला येतात. त्यानुसार सुमारे  ११ महिन्यांचे केळी पीक आहे. 

केळीचे घड कापणीनंतर बागेतील झाडांची छाटणी केली जाते. या वेळी अतिरिक्‍त केळीचे पिल (फुटवे) काढले जातात. त्यांचा काहीच उपयोग नसला तरी सण, उत्सवाच्या काळात पत्रावळी आणि पूजेसाठी केळी पिल याला मागणी राहते. नागपुरातील एका ओळखीच्या व्यक्‍तीकडून दरवर्षी मागणी होते, असे प्रकाश पुप्पलवार सांगतात. त्याला ना नफा ना तोटा तत्त्वावर एक हजार रुपये प्रती गाडी याप्रमाणे केळीची पिल आणि पानांचा पुरवठा नवरात्रीत होतो. तीन ते चार गाड्या त्याच्याव्दारे नेल्या जातात. 

साधारणतः चार ते पाच हजार रुपये यातून मिळत असल्याने केळीमधील छाटणीचा खर्च निघून जातो, असे प्रकाश पुप्पलवार सांगतात. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून केळी पिल आणि पानांना मागणी वाढीस लागली आहे. प्रकाश पुप्पलवार यांची अडीच एकरावर केळी लागवड असून एकरी १५०० झाडे राहतात, असे ते सांगतात. शेतकऱ्यांनी देखील अशा प्रकारच्या बाजारपेठेवर हंगामात लक्ष्य ठेवून असावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com