बुऱ्हाणनगर, केडगाव, मोहोटादेवी येथे नवरात्रोत्सवास प्रारंभ

बुऱ्हाणनगर, मोहाटादेवी येथे घटस्थापना करण्यात आली
बुऱ्हाणनगर, मोहाटादेवी येथे घटस्थापना करण्यात आली

नगर  ः नगर तालुक्‍यातील बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिर व केडगाव येथील रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. तिसऱ्या माळेला बुऱ्हाणनगर येथे तुळजाभवानी मातेच्या पालखीची मिरवणूक काढून यात्रा भरवली जाईल, तर सातव्या माळेला केडगाव येथे यात्रा भरवली जाते, अशी माहिती बुऱ्हाणनगर येथील पुजारी भगत व केडगावच्या गुरव कुटुंबाने दिली.

तालुक्‍यातील कामरगाव येथील कामक्षामाता मंदिर, हातवळण येथील भगवतीमाता मंदिर, चिचोंडी पाटील टेंभी गडावरील भवानीमाता मंदिर, पारगाव-भातोडी येथील वाघेश्‍वरी मंदिर, घोसपुरी येथील पद्मावती मंदिर, जेऊर येथील बायजामाता मंदिर, खडकी येथील तुळजाभवानी मंदिर, निंबळक येथील वैष्णवीमाता मंदिर, पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहाटादेवी गडासह इतर गावांमधील देवी मंदिरांमध्ये घटस्थापनेबरोबरच जागर, पारायण, होमहवनसह धार्मिक कार्यक्रम पार पडले. नवरात्र काळात या गावांतून मोठ्या प्रमाणात यात्रा भरवल्या जातात. ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com