agriculture news in Marathi Nawab malik says skill, agriculture and industry department will support farmers Maharashtra | Agrowon

कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील शेतकऱ्यांना पाठबळ: नवाब मलिक

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी परीक्षा कशी देतात, प्रात्यक्षिक कसे करतात, हे प्रत्यक्ष पाहता आले. प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांशी चर्चा करता आली. याचा आनंद झाला. 
- नवाब मलिक, कौशल्य व उद्योजकता विकासमंत्री तथा पालकमंत्री, परभणी
 

परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियानातून राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये गटशेतीचे महत्त्व पटू लागल्याचा अनुभव आज आला. एकत्रित येऊन उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा विचार या शेतकऱ्यांच्या मनामध्ये रुजविण्यात हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या कंपन्यांमध्ये शेतकरी-कारखानदार तयार करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास, कृषी आणि उद्योग या विभागांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

दामपुरी (जि. परभणी) येथे शनिवारी (ता. २५) कृषी कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी एपी ग्लोबालेचे कार्यकारी उपाध्यक्ष (ईमर्जिंग बिझिनेस) बॉबी निंबाळकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी खासदार सुरेश जाधव, सकाळ मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने, दामपुरीच्या सरपंच सुरेखा गंगाधरराव गमे, सहयोगी संपादक रणजित खंदारे, सिमॅसिस लर्निंग एलपीपीचे सहसरव्यवस्थापक अमोल बिरारी, महाराष्ट्र राज्य उद्योजकता प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख जयंत तांबरे, एक्स्पर्ट नेटचे प्रकल्प व्यवस्थापक जालिंदर गायकवाड, रोहित बडगुजर आदी उपस्थित होते. श्री. बिरारी यांनी प्रास्ताविकात कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा सादर केला. 

मंत्री नवाब मलिक म्हणाले, ‘‘राज्यातील लहान शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गट स्थापन करून एकत्र येणे आवश्यक आहे. सोयाबीन, कापसाला चांगला भाव मिळण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून विक्री केल्यास अधिक फायदा होईल. त्यासाठी हा कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. प्रक्रिया उद्योगामुळे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांना उद्योग उभारणीसाठी मदत करण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे.

चांगल्या प्रक्रिया उद्योगासाठी तयारी केलेल्या शेतकरी गटांना जागा, मदत देण्यासाठी सोयाबीन, हळद, कापूस यासारखी त्या त्या भागातील प्रमुख पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीसाठी उद्योगमंत्र्यांशी बोलून एमआयडीसीमध्ये शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये प्रशिक्षित शेतकऱ्यांना सरकारकडून होईल ती मदत देण्यासाठी प्रयत्न करू. शेतकरी गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.’’ 

या वेळी दामपुरी, ठोळा, उमरी (ता. परभणी), फुलकळस (ता. पूर्णा), चौंडी आंबा, (ता. वसमत, जि. हिंगोली), जाफ्रबाद (जि. जालना) या ठिकाणचे प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते.


इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...