agriculture news in marathi, Naxalist fear due to corona, Maharashtra | Agrowon

नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका; आदिवासींना औषधे पुरवण्यासाठी निर्णय

अनिश पाटील : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा धसका नक्षलवाद्यांनीही घेतल्याचे समोर आले आहे. गडचिरोली, नंदुरबार, धुळे परिसरातील जंगलात राहणाऱ्या आदिवासींना कोरोनाची लक्षणे दिसत असून, त्यांच्यासाठी राज्य तसेच जिल्हा पातळीवरून औषधोपचार करण्याची मागणी नक्षलवाद्यांनी केली आहे.
 

मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा धसका नक्षलवाद्यांनीही घेतल्याचे समोर आले आहे. गडचिरोली, नंदुरबार, धुळे परिसरातील जंगलात राहणाऱ्या आदिवासींना कोरोनाची लक्षणे दिसत असून, त्यांच्यासाठी राज्य तसेच जिल्हा पातळीवरून औषधोपचार करण्याची मागणी नक्षलवाद्यांनी केली आहे.

या वेळी आरोग्य पथकावर कोणतीही नक्षलवादी संघटना गोळीबार करणार नाही; तर मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधी करणार असल्याची माहिती नक्षलवाद्यांनी एका व्हिडीओमार्फत दिली आहे. प्रत्यक्षात काही नक्षलवाद्यांना कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्यामुळे हा कांगावा सुरू असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणा व्यक्त करत आहेत.

देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असल्याची माहिती नक्षलवादविरोधी पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ज्या नक्षलवादी संघटनांनी गोळीचे उत्तर गोळीने दिले, तसेच या नक्षलवादी संघटनांनी सरकारी यंत्रणा तसेच पोलिस यंत्रणेला सातत्याने लक्ष्य केले; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी सपशेल शरणागती पत्करली आहे. नक्षलवाद्यांची विचारधारा ज्या विचारांवर आधारित आहे, त्या विचारांच्या चीनवरही हतबल होण्याची वेळ आली आहे. यामुळे नक्षलवाद्यांना मिळणारा पैसा, शस्त्रे तसेच अन्य स्वरूपातील मदत थंडावली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

देशांत २९ राज्यांतील ७५२ जिल्ह्यांत नक्षलवाद्यांनी हात-पाय पसरले आहेत; तर नक्षलवाद्यांचे सध्या ४२ गट असून, या गटांनी ग्रामीणनंतर मोठ्या प्रमाणांत शहरी भागात प्रवेश केला आहे. मुंबई, पुणेसारख्या शहरांतदेखील नक्षलवाद्यांची संख्या मोठी आहे; मात्र सध्या याच शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे; तर राज्यातील ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. यातून नक्षलवादीही सुटले नसल्याची शक्‍यता आहे, पण ते थेट जाहीर करण्यापेक्षा नक्षलवादी संघटना त्यासाठी आता आदिवासींच्या आरोग्याचे कारण पुढे करत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.

नक्षलवाद्यांनाही कोरोनाची लागण?
नक्षलवाद्यांचे प्राबल्य ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी राहत असलेल्या आदिवासींची वैद्यकीय चाचणीदेखील आवश्‍यक असल्याचे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. कारण या आदिवासींचा मुक्त संचार असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास वेळ लागणार नाही. यामुळे नक्षलवाद्यांनी मागितलेली मदत तसेच शस्त्रसंधीचे दिलेले आश्‍वासन यावर विश्‍वास ठेवून नेमकी कोणती पावले उचलली जातील हे जाहीर केले जाईल, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. 


इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...