जिंतूर फाटा येथे दुष्काळाच्या अनुदानासाठी राष्ट्रवादीचा `रास्ता रोको`

 जिंतूर फाटा येथे दुष्काळाच्या अनुदानासाठी राष्ट्रवादीचा `रास्ता रोको`
जिंतूर फाटा येथे दुष्काळाच्या अनुदानासाठी राष्ट्रवादीचा `रास्ता रोको`

वसमत, जि. हिंगोली : गतवर्षीच्या खरिप हंगामात दुष्काळ जाहीर केलेल्या ५२ गावांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी (ता. २५) कल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्गावर वसमत येथील जिंतूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गतवर्षी टेंभुर्णी, गिरगाव या दोन मंडळांतील ५२ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. परंतु दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कोणतीही आर्थिक मदत, सवलती देण्यात आल्या नाहीत, असे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे, वसमत बाजार समितीचे सभापती राजेश इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देवीदास कऱ्हाळे आदी उपस्थित होते. नायब तहसीलदार सचिन जैस्वाल यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com