हतनूर, तोंडापूरमधील साठ्यात वाढ

हतनूर, तोंडापूरमधील साठ्यात वाढ
हतनूर, तोंडापूरमधील साठ्यात वाढ

जळगाव ः खानदेशात धुळे जिल्ह्यातील पांझरा मध्यम प्रकल्प व तापी नदीवरील सुलवाडे बॅरेज वगळता पाच प्रकल्प कोरडेच आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील गिरणा, वाघूर व सातपुडा पर्वतालगतचे प्रकल्प भरण्याची प्रतीक्षा कायम आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० जुलैनंतर पावसाला चांगली सुरवात होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हा पाऊस काही दिवस जोर पकडेल, असे वाटले होते. मात्र, पावसाने जळगाव जिल्ह्यात हूल दिली. धुळे, नंदुरबारात मंगळवारी (ता. २३) अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. परंतु यामुळे लहान बंधारे भरले. मोठ्या प्रकल्पांमधील साठा फारसा वाढला नाही. जळगाव जिल्ह्यात असह्य उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत.  खानदेशात २३ जूनपासून पावसाला सुरवात झाली. सुरवातीला कमीअधिक प्रमाणात शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान असून, पेरण्या जवळपास आटोपल्या आहेत. तीन ते सहा जुलैदरम्यान अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेतर्फे देण्यात आला होता. तेव्हाही दमदार पाऊस झाला नाही. तर या आठवड्यातही पावसाने जळगाव, पूर्व धुळे जिल्ह्यात जोरदार हजेरी लावलेली नाही. अमळनेर, पारोळा भागांत या आठवड्यात काही गावांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. परंतु जळगाव, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा, धरणगाव, यावल या भागांत पावसाची प्रतीक्षा असून, प्रकल्पही भरलेले नाहीत.

अनेक धरणांत ठणठणाट जिल्ह्यातील अग्नावती, हिवरा, बहुळा, अंजनी, गूळ, भोकरबारी, बोरी, मन्याड या धरणांत अद्याप शून्य टक्‍का जलसाठा आहे. अनेक गावांना अजूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर सातपुडा पर्वतालगत रावेरातील मंगरूळ, सुकी व अभोरा प्रकल्पही ५० टक्‍क्‍यांवर भरलेले नाहीत. यावलमधील मोर प्रकल्पातही २१ टक्के जलसाठा आहे. तर धुळ्यातील अनेर प्रकल्पातील साठाही ६० टक्‍क्‍यांखाली आहे.

गुरुवार (ता. २५) अखेरीस धरणातील साठा हतनूर -२३.२९, गिरणा-७.४८ , वाघूर -१९.४४, अभोरा- ३३.४६, सुकी-१८.५४, मोर-२१.२२, तोंडापूर-७८.११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com