इंडिनेशियात भूकंप; 384 जणांचा मृत्यू

इंडिनेशियात भूकंप; 384 जणांचा मृत्यू
इंडिनेशियात भूकंप; 384 जणांचा मृत्यू

इंडोनेशिया- इंडोनेशिया देशातील सुलावेसी बेटावर काल (ता. 28) भूकंपाचा तडाखा बसला. समुद्रात झालेल्या शक्तिशाली भुकंपानंतर इंडोनेशियाच्या पालू शहराला भयानक अशा सुनामी लाटांचा तडाखा बसला. या नैसर्गिक आपत्तीत अनेकांना जखमी अवस्थेत विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, येथील एका रुग्णालयात आज (ता.29) यांपैकी 30 जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त दिले होते. मात्र, आता मृतांचा आकडा एकूण 384 वर पोहोचला आहे. आणखी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुकंप येथिल पालू शहराला बसला. सुमारे साडे तीन लाख लोकांना याचा फटका बसला.

या भूकंपानंतर लोकांना आपली घरे सोडून रस्त्यावर यावे लागले आहे. लोक भीतीने घाबरून घरे सोडून पलायन करत असल्याचे चित्र सध्या तिथे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com