agriculture news in Marathi, Need of 97 thousand quintals of seeds for Parbhani Kharif | Agrowon

परभणीत खरिपासाठी ९७ हजार क्विंटल बियाण्यांची गरज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

परभणी ः परभणी जिल्ह्यात २०१९-२० च्या खरीप हंगामामध्ये ५ लाख ६३ हजार ८१८ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी सार्वजनिक आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे एकूण ९७ हजार ३६ बियाण्यांची गरज आहे. या संदर्भात जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी माहिती दिली.

परभणी ः परभणी जिल्ह्यात २०१९-२० च्या खरीप हंगामामध्ये ५ लाख ६३ हजार ८१८ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी सार्वजनिक आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे एकूण ९७ हजार ३६ बियाण्यांची गरज आहे. या संदर्भात जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी माहिती दिली.

येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख ६३ हजार ८१८ हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे, खते आदी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे. २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत जिल्ह्यात सरासरी ४० हजार ७१ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. यंदा खरिपात ५ लाख ६३ हजार ८१८ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. यामध्ये ज्वारी १० हजार हेक्टर बाजरी १ हजार हेक्टर, भात १० हेक्टर, मका १ हजार हेक्टर, तूर ४९ हजार हेक्टर, मूग १८ हजार हेक्टर, उडीद ९ हजार हेक्टर, भूईमूग ५० हेक्टर, तीळ ५०० हेक्टर, सूर्यफूल ५०० हेक्टर, सोयाबीन २ हजार ४९ हजार हेक्टर, कापूस १ लाख ९५ हजार हेक्टर, अन्य पिकांची २ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. 

प्रस्तावित बियाणे बदल दरानुसार सार्वजनिक बियाणे उत्पादक कंपन्यांकडे ५५ हजार २३८ क्विंटल आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे ४१ हजार ७९८ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. ज्वारीच्या ७५० क्विंटल, बाजरीच्या १५ क्विंटल, भाताच्या ३ क्विंटल, मकाच्या १५० क्विंटल, तुरीच्या ४ हजार ४१० क्विंटल, मुगाच्या १२०० क्विंटल, उडिदाच्या ६०० क्विंटल, भूईमुगाच्या ३ क्विंटल, तिळाच्या ९ क्विंटल, सूर्यफुलाच्या १५ क्विंटल, सोयाबीनच्या ८५ हजार क्विंटल, कपाशीच्या ४ हजार ८७५ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.

महाबीजकडे ५५ हजार २३८ क्विंटल बियाण्यांची मागणी...
महाबीजकडे सोयाबीनच्या जेएस ३३५ वाणाचे १० क्विंटल, एमएयूएस ७१ वाणाचे ३ हजार २८० क्विंटल, एमएयूएस १५८ वाणाचे १ हजार ४०० क्विंटल, डीएस २२८ वाणाचे ५० क्विंटल, एमएसीएस एच १२ वाणाचे ३०० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. तुरीच्या आयसीपीएल ८७११९ वाणाचे १५ क्विंटल, बीएसएमआर ७३६ वाणाचे १९० क्विंटल, बीएसएमआर ८५३ वाणाचे ५ क्विंटल, बीडीएन ७१६ वाणाचे ५० क्विंटल, विपुला वाणाचे २५ क्विंटल, बीडीएन ७११ वाणाचे ११० क्विंटल बीडीएन ६०८ वाणाचे ६० क्विंटल, मुगाच्या कोपरगाव वाणाचे १० क्विंटल, बीएम २००२-१ वाणाचे २० क्विंटल, उत्कर्षा वाणाचे ९५ क्विंटल, बीएम २००३-२ वाणाचे ८५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली.

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...