शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत होणे गरजेचे ः भाले

शेतकऱ्यांना काळानुरूप शाश्वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत होणे गरजेचे असल्याने यासाठी प्रात्यक्षिके व प्रशिक्षणाचे आयोजन अधिक लाभदायी ठरेल, असा आत्मविश्वास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केला.
Need to be aware of sustainable cotton production technology: Spears
Need to be aware of sustainable cotton production technology: Spears

अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या पिकात शेतकऱ्यांना काळानुरूप शाश्वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत होणे गरजेचे असल्याने यासाठी प्रात्यक्षिके व प्रशिक्षणाचे आयोजन अधिक लाभदायी ठरेल, असा आत्मविश्वास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केला.

कृषी संशोधन केंद्र, एकर्जुना (जिल्हा चंद्रपूर) येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र शासन व मुंबई येथील इंडो काउंट इंडस्ट्रीज प्रा.लि यांच्यात ‘कापूस पिकासाठी सेंटर फॉर एक्सलन्स’ स्थापन करण्याबाबत अकोल्यात कुलगुरू कार्यालयात आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस पिकापासून अधिक उत्पन्न मिळण्यासाठी नावीन्यपूर्ण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच सेंद्रिय कापूस उत्पादनाबाबत विद्यापीठ प्रक्षेत्रावर तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके व प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने हा सामंजस्य करार महत्त्वाचा ठरेल, असे मतही डॉ. भाले यांनी व्यक्त केले. 

संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी मत मांडले. मध्य विदर्भ विभागाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार यांनीही मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खर्चे, कृषी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक श्री. मनमोठे, इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शाश्‍वत शेतीचे व्यवस्थापक प्रशांत टेकाडे, तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय देशमुख, बियाणे उपसंचालक डॉ. वर्षा टापरे, डॉ. ए. एस. लाटकर, डॉ. सुरेंद्र देशमुख, डॉ. निरज सातपुते उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com