हवामान बदलानुसार कडधान्य वाणनिर्मितीची गरज

The need for cereal varieties according to climate change  
The need for cereal varieties according to climate change  

पीक उत्पादनासाठी पाणी व माती या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचा ताण व उच्च तापमानास सहन करणारे वाण निर्माण करणे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने व कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्याकरिता गरजेचे ठरणारे आहे.

भविष्याचा विचार करता कडधान्य पिकाच्या नवीन वाणाची वाढत्या जैविक, अजैविक ताणात टिकून राहून उत्पादकतेमध्ये वाढ कशी होईल याचा अभ्यास करणे गरजेचे हे. अधिक कालावधी, अधिक पाणी लागणारे कडधान्य पिकांचे वाण भविष्यात निष्फळ ठरणार आहेत. जगात कडधान्यांचा सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि आयातदार अशी भारताची ओळख आहे. कडधान्य ही प्रथिनांनी समृध्द असतात. १०० ग्रॅम कडधान्यामध्ये १७ ते २५ टक्क्यांपर्यंत प्रथिने असतात. याला अपवाद म्हणजे सोयाबीन यामध्ये प्रथिनांचे प्रमाण ४०-४२ टक्के असते. शाकाहारी आहारामध्ये प्रथिनांची पूर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते. प्रथिनाव्यतिरिक्त कडधान्यामध्ये ब जीवनसत्वे, खनिजे आणि मेद भरपूर प्रमाणात असतात. तूर

  • हे पीक खरीप हंगामातील महत्त्वाचे कडधान्यवर्गीय पीक असून महाराष्ट्र राज्य क्षेत्र आणि उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. परंतु, हे पीक पाऊसमान चांगला व समप्रमाणात पडला तरच शक्य आहे अन्यथा सन २०१४-१५, २०१५-१६ व २०१८-१९ सारखी परिस्थिती राहिल्यास उत्पादनामध्ये फार मोठी घट येते याचाच अर्थ तुरीमध्ये पाण्याचा ताण सहन करणारे वाण निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच हे वाण मर व वांझ या महत्त्वाच्या रोगांना प्रतिकारक/मध्यम प्रतिकारक असणे गरजेचे आहे.  
  • महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ व मराठवाडा या भागांत उशिरा पक्व होणाऱ्या वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात होते जर पीक फुलावर किंवा शेंगा लागताना/शेंगात दाणे भरत असतानाच्या अवस्थेत जर पाण्याचा ताण पडल्यास सुद्धा फार मोठ्या प्रमाणात घट होते. त्यामुळे साधारण १३०-१४० दिवसांत अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करणे गरजेचे आहे.  
  • तुरीमध्ये सर्वात महत्त्वाची कीड म्हणजे शेंगा पोखरणारी अळी किंवा मरुका कीड या किडीमुळे साधारणपणे ३५ ते ४० टक्के नुकसान होते. तुरीचे खऱ्या अर्थाने उत्पन्न वाढवायचे असेल तर अधिक उत्पादनक्षम संकरित वाण निर्माण करणे गरजेचे आहे. सध्याचे संकरित वाण हे सुधारित वाणापेक्षा कमी उत्पादन देतात.
  • मूग व उडीद

  • हे दोन्ही कडधान्य पिके कमी दिवसात पक्व होणारे व पावसाच्या पाण्यावर खरिपात येणारी पिके आहेत. परंतु, पाऊस जर उशिरा सुरू झाला तर पर्यायाने दोन्ही पिकांची उशिरा पेरणी होते व उत्पादनात मोठी घट येते.  
  • दिवसेंदिवस या दोन्ही पिकांचे क्षेत्र कमी होत असल्याचे दिसून येते. त्यासाठी उशिरा पेरणीसाठी उपयुक्त असे वाण निर्माण करणे गरजेचे आहे.  
  • मुगामध्ये भुरी व पिवळा विषाणू या रोगास प्रतिकारक व शेंगा एकाच वेळेस पक्व व यांत्रिक पद्धतीने काढण्यास उपयुक्त असे वाण निर्माण करण्याची गरज आहे. तसेच रब्बीमध्ये लागवडीसाठी उपयुक्त वाण निर्माण करणे गरजेचे आहे.
  • संपर्कः डॉ. नंदकुमार कुटे, ७५८८५१३३९८ (कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com