पीकविमा योजनेच्या निकषांत बदल गरजेचा ः पालकमंत्री चव्हाण

नांदेड : इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा परताव्याचे प्रमाण अत्यल्प आहे. हा जिल्हा हमखास पडणाऱ्या पावसाच्या क्षेत्रात मोडत असला तरी अलीकडच्या काळात हवामान बदलामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतमाल नुकसानीचे प्रमाण हे पीकविमा कंपन्यांच्या निकषांपलीकडचे आहे. त्यामुळे या योजनेच्या निकषांत बदल आवश्यक आहेत. त्यादृष्टीने सर्व गोष्टींचा सारासार विचार करून जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ कसा मिळेल, यासाठी नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
Need to change the criteria of crop insurance scheme: Guardian Minister Chavan

जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात कृषी विभाग व सहकार विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चव्हाण बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, सहायक आयुक्त तेजस माळवदकर, गणपत तिडके उपस्थित होते.

पालकमंत्री चव्हाण म्हणाले, की शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीन बियाणांची उगवण कमी झाल्याने संबंधित बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करून तेवढ्यावर थांबता येणार नाही. या बियाणे कंपन्यांनी स्वत:हून पुढे येत शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई देणे अपेक्षित आहे. यासाठी शासनस्तरावरून जर काही हस्तक्षेप करावा लागला, तर जिल्हा प्रशासनाने तो वेळेवर करून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची कमतरता होऊ नये, यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. बँकांकडून शेतकऱ्यांना वेळेत पीककर्जाचे वाटप होणे गरजेचे असून त्यात शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पेरणी क्षेत्र, बियाणे व खत उपलब्धता, पीककर्ज वाटप, शेतमालाची हमीभावाने खरेदी आदी विषयांचा आढावा पालकमंत्री चव्हाण यांनी या वेळी घेतला.

जिल्ह्यात सोयाबीन पिकाची ३ लाख ८ हजार ४ हेक्टर व कापूस पिकाची १ लाख ९३ हजार ४४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकामध्ये उगवण कमी झाल्याने ११ हजार ५३ एवढ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात १५ ते १६ हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. यातील बहुतांश क्षेत्रावर पेरणी सुरू झाली असून कापूस, तूर, मूग व इतर पिकांची बियाणे बाजारात उपलब्ध आहेत, अशी माहिती चलवदे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com