agriculture news in marathi, need of change in drought norms | Agrowon

‘दुष्काळाच्या निकषांसाठी शासनाने तज्ज्ञांची बैठक घ्यावी’

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे : कमी पाऊस झाल्यामुळे सरकारला दुष्काळ जाहीर करणे अपरिहार्य आहे. मात्र त्याबाबतचे निकष काय असावेत, याविषयी जनमानसांत संभ्रम आहे. त्यावर उपाय म्हणून सरकारने निकष ठरविण्यासाठी तत्काळ जलतज्ञ, कृषितज्ञांची तसेच सामाजिक क्षेत्रातील जाणकारांची एकत्रित बैठक बोलवावी. त्यानंतर बैठकीतील सूचनांनुसार योग्य ते निकष ठरवावेत, असे असे मत केंद्रीय भूजल विभागातील भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी व्यक्त केले. 

पुणे : कमी पाऊस झाल्यामुळे सरकारला दुष्काळ जाहीर करणे अपरिहार्य आहे. मात्र त्याबाबतचे निकष काय असावेत, याविषयी जनमानसांत संभ्रम आहे. त्यावर उपाय म्हणून सरकारने निकष ठरविण्यासाठी तत्काळ जलतज्ञ, कृषितज्ञांची तसेच सामाजिक क्षेत्रातील जाणकारांची एकत्रित बैठक बोलवावी. त्यानंतर बैठकीतील सूचनांनुसार योग्य ते निकष ठरवावेत, असे असे मत केंद्रीय भूजल विभागातील भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी व्यक्त केले. 

आंतरराष्ट्रीय भूविज्ञान दिनानिमित्त द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या वतीने ‘जलक्षेत्रातील मिथकं आणि वास्तव’ या विषयावर मंगळवारी (ता.१६) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 
या वेळी श्री. धोंडे बोलत होते. या वेळी मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ, सुनील जोशी, मिलिंद बागल, शैलेंद्र पटेल आदी उपस्थित होते. 

या वेळी श्री. धोंडे म्हणाले, की राजकीय दबावापोटी दुष्काळाचे निकष लावताना शेतकऱ्यांमध्ये भेदभाव होऊ नये. मात्र, दुष्काळ जाहीर करताना राजकीय दबावापोटी निकष लावले जात आहे. मुळातच दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत ही चुकीची आहे. हा दुष्काळ नैसर्गिक नसून राजकीय आहे. दुष्काळ टाळायचा असेल तर सात वर्षाचक्र गृहीत धरून दुष्काळाचे नियोजन केले पाहिजे. परंतु, ते शासनाकडून होताना दिसत नाही. जलसंधारणाच्या ज्या योजना सरकारी किवा खासगी संस्थानी राबविल्या आहेत. त्याच्या परिणामकारकतेची तपासणी ही तज्ञांच्या समितीमार्फत सातत्याने व्हायला पाहिजे. मात्र, आज अशी तपासणी होताना दिसत नाही. जलसंधारणाच्या कामांविषयी अत्याधुनिक पद्धतीने प्रशिक्षण न दिल्यामुळे चुकीच्या पद्धतीने कामे होत आहे. या चुकीच्या पद्धतीमुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया कमी आहे. पाणीपातळी वाढण्याऐवजी कमी होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची दाहकता ही दिवसेंदिवसे वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. 

आज राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून शासनाला दुष्काळ जाहीर करावाच लागेल, अशी स्थिती तयार झाली आहे. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढणार आहे, असे म्हटले जाते. मात्र, यापूर्वी झालेल्या पावसाच्या पाण्याचे आपण काय केले. त्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या याचा विचार करावा लागेल.
शासनाला जलतज्ञ कोण आहेत याचीसुद्धा माहिती नाही. या उलट शासन प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीना जलनायक, जलमित्र, जलतज्ञांची उपाधी देण्यात येते हे चुकीचे आहे. त्यामुळे जलसाक्षरतेवर दुष्परिणाम होत आहे. राज्यामध्ये सरकारी व निमसरकारी संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात जलतज्ज्ञ उपलब्ध असताना दुष्काळावर मात करण्याकरिता ठोस उपाय म्हणून एकमत होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सरकारने पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे, असे श्री. धोंडे यांनी स्पष्ट केले.


इतर बातम्या
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढकोल्हापूर : जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर...
नाशिक : अतिवृष्टीनंतर कपाशीवर करपाचा...नाशिक : अतिवृष्टीमुळे सातत्याने कपाशी लागवडीमध्ये...
कृषी संशोधन केंद्रे पांढरा हत्ती ठरू...भंडारा ः सर्वाधिक रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो...
मधमाश्या, मित्रकीटक वाचविण्यासाठी...नाशिक: मधमाश्यांची संख्या जगभरात तसेच भारतातही...
बाधितांसाठी मागितले दहा कोटी अन्‌...आटपाडी, जि. सांगली ः अवकाळी पावसामुळे आटपाडी...
शेतकरी संघटनेचे गुरुवारी निर्बंधमुक्ती...नगर ः संपूर्ण कर्जमाफी करून राज्यातील शेतकऱ्यांचा...
पुणे : फळपीक विमा योजना असून नसल्यासारखीपुणे : फळपिकांना हवामानाच्या धोक्यापासून संरक्षण...
गडहिंग्लजमध्ये ज्वारीचे क्षेत्र एक हजार...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : अतिवृष्टी आणि अवकाळी...
बाजारपेठेवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब...नगर  : ‘‘कमी पाणी व जास्त पाणी, अशा दोन...
नवीन वर्षात ७५० ग्रामपंचायतींच्या...पुणे : येत्या नवीन वर्षात जुलै ते डिसेंबर २०२० या...
हिंगोली जिल्ह्यात रब्बीची ७६ हजार...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...