मूल्यवर्धनासह पीकनिहाय गुंतवणुकीची गरज : विलास शिंदे

मूल्यवर्धनासह पीकनिहाय गुंतवणुकीची गरज : विलास शिंदे
मूल्यवर्धनासह पीकनिहाय गुंतवणुकीची गरज : विलास शिंदे

ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी पीकनिहाय नियोजन व त्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. उत्पादित शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करणे हे आज कृषी क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. त्यासाठी प्रत्येक पिकामध्ये गुंतवणूक आवश्यक आहे. ज्याप्रमाणे साखर उद्योगासाठी गुंतवणुकीची तरतूद आहे, तशीच ती प्रत्येक पिकात व्हावी. यासाठी धोरणाचा भाग म्हणून गांभीर्याने पाहावे लागेल. यासाठी रस्ते, पाणी, वीज या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. नेहमीप्रमाणे होणारी तुटपुंजी मदत न देता दीर्घकालीन तरतुदींची गरज आहे. याकरिता १८ वेगवेगळ्या पिकांची मूल्यवर्धित साखळी उभी राहणे गरजेचे आहे. प्रत्येक शेतकरी या साखळीमध्ये जोडला गेला तरच ही यंत्रणा चांगल्या प्रकारे उभी राहू शकते. अशा शाश्वत मूल्य साखळीची उभारणी करून शेती हा एक फायदेशीर उद्योग म्हणून नावारूपास येऊ शकतो. उपलब्ध संसाधने व संधीची सांगड घालून ही यंत्रणा उभी करता येईल. शेती हा उद्योग मानून याबाबतीत धोरणे आखली जावीत. या क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलून गुंतवणूक व्हावी. आज पाहिले तर, शेतीविषयक अनेक तरतुदींमध्ये गोंधळ आहे. यावर वस्तुनिष्ठ विचार होऊन विकासात्मक धोरणे तयार व्हावीत. पिकांसाठी मूल्यवर्धित साखळी उभ्या राहून त्या शेतकऱ्यांच्या १०० टक्के मालकीच्या असायला हव्यात. या माध्यमातून 'उत्पादन ते विक्री' अशी सक्षम व्यवस्था उभी राहावी. यासाठी १.५० लाख कोटी रुपयांची विविध पीकनिहाय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यातून जागतिक दर्जाची मूल्यवर्धित साखळी तयार होईल; जी जागतिक बाजारामध्ये टिकाव धरू शकेल. यासाठी दीर्घकालीन धोरणांचा भाग म्हणून सर्वांगीण काम करावे लागेल. अन्नप्रक्रिया हा या साखळीतील एक भाग असेल. शाश्वत शेती विकासासाठी मूल्यवर्धित मूल्य साखळी ही शेतकऱ्यांच्या स्वमालकीच्या हवी. ती तुकड्यात विभागलेली नसावी तर संबंधपूर्ण व संलग्नपूर्ण असायला हवी, यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन एकात्मिक प्रणाली उभी करताना पीकनिहाय गुंतवणूक अपेक्षित वाटते. तरच उद्याचे शेतीक्षेत्रातील भविष्य वाटते. प्रत्येक पिकाकडे उद्योग म्हणून पाहावे लागेल.  - विलास शिंदे, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक,  सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी (जि. नाशिक) (शब्दांकन - मुकुंद पिंगळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com