रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज : आदित्य ठाकरे

रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज : आदित्य ठाकरे
रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज : आदित्य ठाकरे

अकोला  ः लहान शहरांमध्ये रोजगार निर्मिती होत नाही. त्याला जबाबदार ही आजची शिक्षणपद्धत आहे. रोजगार उपलब्ध असतानाही तशा पद्धतीचे अभ्यासक्रम नसल्याने आजची इंडस्ट्री ही देशातील शिक्षण पद्धतीच्या पाच वर्षे पुढे आहे. त्यामुळे रोजगाराभिमुख शिक्षण प्रणाली विकसित करावी लागेल, असे मत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. गुरुवारी (ता.२९) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आदित्य संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.  शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आदित्य यांनी देशातील सध्याची शिक्षण प्रणाली, विद्यार्थ्यांच्या समस्या, विद्यार्थिनींची सुरक्षा, रोजगार आदी विषयांवर संवाद साधला. शिक्षण प्रणालीत बदल करताना पुढील ५० वर्षांचा विचार करून रोजगार निर्मिती करणारी शिक्षणप्रणाली विकसित करावी लागेल. खासगी शिक्षणतील लुट थांबावी यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव देऊ, मुंबई महापालिकेत मोफत शिक्षणाचा प्रयोग राबविला आहे, तो संपूर्ण राज्यात लागू झाला पाहिजे. एसटीच्या विलीनीकरणासाठी राज्य शासनासोबत चर्चा करू. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com