agriculture news in marathi Need to extent deadline of government scheme deadline | Agrowon

३१ मार्च नजीक : शासकीय योजनांना मुदतवाढीची गरज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 मार्च 2020

अकोला  : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सरकारी कामकाजासह जनजीवन ठप्प झाले आहे. शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती पाच टक्क्यांवर आणण्यात आली आहे. अशातच ‘मार्च एण्ड’ जवळ आल्याने या महिना अखेर लाभार्थी अनुदान जमा न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

अकोला  : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सरकारी कामकाजासह जनजीवन ठप्प झाले आहे. शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती पाच टक्क्यांवर आणण्यात आली आहे. अशातच ‘मार्च एण्ड’ जवळ आल्याने या महिना अखेर लाभार्थी अनुदान जमा न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

या आनुषंगिक ३१ मार्च मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवायची गरज व्यक्त होत आहे. याबाबत धोरणात्मक दिशानिर्देश शासनस्तरावरून काढण्याची गरज आहे. शासनाच्या बहुतांश योजनांचे अनुदान हे ३१ मार्चपर्यंत वितरित करायचे असते. शासनाने डिजिटल धोरण स्वीकारल्यापासून विविध योजनांच्या साइटवर ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने हे काम पूर्ण होणे गरजेचे असते. त्यानंतर याकरिताचे संकेतस्थळे (वेबसाईट) आपोआप बंद होतात. अशा स्थितीत वेळेत ऑनलाइन प्रक्रिया न झाल्यास लाभार्थी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता अधिक आहे. 

सध्या कोरोनामुळे शासकीय कार्यालयातील उपस्थिती पाच टक्क्यांवर आणल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. विशेषतः जिल्हा परिषद, कृषी विषयक योजनांच्या अंमलबजावणीत हा अडथळा मोठा बाधक ठरू शकतो. अशा स्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने योजनांच्या लाभासाठी ३१ मार्च ही मुदत वाढवून ३० एप्रिलपर्यंत करण्याची मागणी केली जात आहे.


इतर अॅग्रो विशेष
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...