Agriculture news in Marathi, Need for integrated measures to control US military larvae | Agrowon

लष्करी अळी नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनांची गरज ः कुलगुरू डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

परभणी ः मक्यावरील लष्करी अळीचा प्रसार झपाट्याने होत आहे. या घातक अळीच्या नियंत्रणाचे आव्हान निर्माण झाले आहे. कीड रोग सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी लष्करी अळीच्या संवेदनशील अवस्थेत उपलब्ध असलेल्या सर्व आयुधांचा वापर एकत्रित आणि एकात्मिक पद्धतीने करून या अळीच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

परभणी ः मक्यावरील लष्करी अळीचा प्रसार झपाट्याने होत आहे. या घातक अळीच्या नियंत्रणाचे आव्हान निर्माण झाले आहे. कीड रोग सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी लष्करी अळीच्या संवेदनशील अवस्थेत उपलब्ध असलेल्या सर्व आयुधांचा वापर एकत्रित आणि एकात्मिक पद्धतीने करून या अळीच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभाग यांच्यातर्फे पिकांवरील कीड -रोग सर्वेक्षण प्रकल्प (क्रॉपसॅप)अंतर्गत कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि कृषी विद्यापीठातील समन्वयक यांच्या मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षणाच्या उद्‍घाटन कार्यक्रमामध्ये डॉ. ढवण बोलत होते.

या वेळी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विभागीय कृषी अधीक्षक अधिकारी डी. जी. मुळे, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एस. झंवर, उपविभागीय अधिकारी सागर खटकाळे, बी. एस. कच्छवे, आर. टी. सुखदेव उपस्थित होते.

डॉ. ढवण पुढे म्हणाले, ‘‘कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, महसूल विभाग यांच्यातील समन्वयामुळे गतवर्षी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण व्यवस्थितरीत्या करता आले. मध्यम कालावधीच्या वाणांची लागवड, फरदड निर्मूलनातून गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करणे शक्य आहे. परंतु मक्यावरील लष्करी अळी बहुवार्षिक आहे. तिचा प्रसार झपाट्याने होत असल्याने मका पिकासाठी ही अळी अतिशय घातक ठरत आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी समाज माध्यमांचा उपयोग करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. .’’ प्रास्ताविक डॉ. झंवर यांनी केले. डॉ. अनंत बडगुजर यांनी केले. तर आर. के. सय्यद यांनी आभार मानले.
 


इतर बातम्या
अंजीर-सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ...पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या ...
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
महिनाभरात पडणार नाशिक विभागातील साखर...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ३२ पैकी केवळ...
महिलांनी मालक बनले पाहिजे ः राज्यपालमुंबई ः महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी...मुंबई ः दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी...
ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न का वाढत नाही...पुणे: देशात ५० टक्के रोजगार हा शेतीशी निगडित व...
नागपूर : थंडीची तीव्रता वाढली; अंडी...नागपूर ः थंडीच्या दिवसांत मागणी वाढत अंड्यांचे...
निफाडला २.४ अंश तापमान; राज्य थंडीने...पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या...
शेतात नवे प्रयोग करणारे शेतकरी आमचे...मुंबई ः प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग...
चिखलदऱ्याच्या स्ट्राॅबेरीला हवाय...अमरावती ः लागवड खर्चाच्या दुप्पट उत्पन्न मिळवून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १८ लाख टन...औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद साखर सहसंचालक...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...
अकोल्यात भारिप, वाशीममध्ये...अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष...
पुणे जिल्ह्यात उद्या पल्स पोलिओ लसीकरण...पुणे : पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या...
पत्नीच्या नावे कामकाजासाठी येणाऱ्या...बुलडाणा ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना...
पाणी, शेती विकासासह समाजकारणाला...नगर : निवडणुकीत पराभव मी मानत नाही. लोकांचे...