agriculture news in Marathi need of make strong FPOs Maharashtra | Agrowon

‘एफपीओं’ना बळकट करण्याची गरज ः चढ्ढा 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) अधिक प्रभावी काम करत आहे.

पुणे ः शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) अधिक प्रभावी काम करत आहे. त्यांना अधिक बळकट करण्याची गरज आहे, असे मत ‘नाफेड’चे कार्यकारी संचालक संजीवकुमार चढ्ढा यांनी व्यक्त केले. 

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (ता.१५) आयोजित कार्यक्रमात चढ्ढा बोलत होते. या वेळी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या केंद्रीय बोर्डाचे संचालक सतीश मराठे, वैकुंठ मेहता संस्थेचे संचालक डॉ. के. के. त्रिपाठी, रजिस्टार व्ही. सुधीर या वेळी उपस्थित होते. 

चढ्ढा म्हणाले, की व्यासायिकतेच्या अभावामुळे सहकार क्षेत्र कमकुवत होत चालले आहे. तर शेतकरी उत्पादक कंपन्या व्यावसायिकतेमुळे सक्षम होत आहेत. शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या एकत्रित येऊन काम करत आहेत. या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगले दर मिळत असून, अनेक कंपन्या चांगले काम करत आहेत.

कंपन्यांच्या माध्यमातून गावागावांत बाजार उभारणे गरजेचे असून, हे बाजार ई-नाम सोबत ऑनलाइन फ्लॅटफॉर्मशी संलग्न करणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने चांगल्या योजनांची आखणी देखील केली आहे. कंपन्यांनी आता शेतीमालाच्या मुल्यवर्धनासाठी केवळ ग्रेडिंग, पॅकिंग पर्यंतच मर्यादित न राहता प्रक्रिया आणि शीतसाखळीमध्ये अधिक सक्षमतेने काम करण्याची गरज आहे. 

या वेळी सहकार क्षेत्रावरील स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आभार व्ही. सुधीर यांनी मानले.

शेतीतून केवळ ३५ टक्के उत्पन्न 
शेतीमधील उत्पन्न पद्धत (इन्कम पॅटर्न) बदलत असून, शेतीतून केवळ ३५ टक्के उत्पन्न मिळत आहे. इतर क्षेत्रातून ६० टक्के उत्पन्न मिळत आहे. सहकार क्षेत्रावर ४८ कोटी नागरिक अवलंबून आहेत. मात्र सहकार कायद्यात बदल होत नसल्याने सहकार अडचणीत येत आहे. तर कंपनी कायद्यात सारखे बदल होत असल्याने शेतकरी उत्पादक कंपन्या अधिक चांगले काम करू लागले आहेत. सहकारातील कंट्रोल आणि रेग्युलेशनमुळे सहकाराला बदलण्याची गरज आहे, असे सतीश मराठे म्हणाले. 

 


इतर अॅग्रो विशेष
‘मागेल त्याला शेततळे’च्या ८४ कोटी...नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे...
कृषिपंप रिवाइंडिंग करणाऱ्या महिला...हिंगोली ः जिल्ह्यातील आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी)...
बीज परीक्षण करतात ‘मिळून साऱ्याजणी’ परभणी ः परभणी येथील कृषी विभागाच्या ‘आयएसओ’...
अडीच कोटी उलाढाल करणाऱ्या शेतकरी...जळगाव ः वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपये एकूण...
मनीषाताईंनी विकसित केले तीन गुंठ्यांत...सोलापूर ः पोषण मूल्यावर आधारित अवघ्या तीन...
महिलांची शेतकरी कंपनीच्या माध्यमातून...पुणे ः महिला उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन करून...
कांदा चाळीचे अखेर मिळाले अनुदाननगर ः कृषी विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतर २०१८-...
मुलींनी सांभाळली वडिलांची शेती नांदेड : हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील गणेश...
विदर्भात अवकाळीची शक्यता पुणे : दक्षिण आसामच्या परिसरात चक्रीय स्थिती तयार...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
जिद्द अन् प्रयोगशीलतेतून निर्माण केली...पती निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अंगावर आली. जवळ...
उन्हाचा चटका वाढतोय पुणे ः राज्यात आकाश निरभ्र झाल्याने उन्हाचा चटका...
आता ‘बीडीओ’ देणार विहिरींना मंजुरी कऱ्हाड, जि. सातारा ः महात्मा गांधी राष्ट्रीय...
आकड्यांच्या गोंधळात नियोजनाचा फज्जा पुणे ः यंदा सरकारने शेतीमालाचे विक्रमी उत्पादनाचे...
खानदेशात कलिंगड, काकडी, पपई दरांवर दबाव जळगाव ः खानदेशात पपईला हंगाम अंतिम टप्प्यात...
‘देर आए’ आता दुरुस्त करा केंद्रीय कृषी मंत्रालय राज्यांच्या कृषी सांख्यिकी...
पीक लागवड, उत्पादनाच्या आकड्यांचा...सरकारने नुकताच यंदाच्या पीक उत्पादनाचा दुसरा...
गारपिटीची माहिती देऊनही नावे वगळली अकोला ः जिल्ह्यात अकोट तालुक्यात १८ फेब्रुवारीला...
शेतीमध्येही रंगवितो प्रयोगशीलतेचे धडेपरभणी येथील गांधी विद्यालयामध्ये कला शिक्षक...
विदर्भात तापमान चाळिशीपार पुणे ः उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी होऊ...