agriculture news in Marathi need of make strong FPOs Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘एफपीओं’ना बळकट करण्याची गरज ः चढ्ढा 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) अधिक प्रभावी काम करत आहे.

पुणे ः शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) अधिक प्रभावी काम करत आहे. त्यांना अधिक बळकट करण्याची गरज आहे, असे मत ‘नाफेड’चे कार्यकारी संचालक संजीवकुमार चढ्ढा यांनी व्यक्त केले. 

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (ता.१५) आयोजित कार्यक्रमात चढ्ढा बोलत होते. या वेळी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या केंद्रीय बोर्डाचे संचालक सतीश मराठे, वैकुंठ मेहता संस्थेचे संचालक डॉ. के. के. त्रिपाठी, रजिस्टार व्ही. सुधीर या वेळी उपस्थित होते. 

चढ्ढा म्हणाले, की व्यासायिकतेच्या अभावामुळे सहकार क्षेत्र कमकुवत होत चालले आहे. तर शेतकरी उत्पादक कंपन्या व्यावसायिकतेमुळे सक्षम होत आहेत. शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या एकत्रित येऊन काम करत आहेत. या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगले दर मिळत असून, अनेक कंपन्या चांगले काम करत आहेत.

कंपन्यांच्या माध्यमातून गावागावांत बाजार उभारणे गरजेचे असून, हे बाजार ई-नाम सोबत ऑनलाइन फ्लॅटफॉर्मशी संलग्न करणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने चांगल्या योजनांची आखणी देखील केली आहे. कंपन्यांनी आता शेतीमालाच्या मुल्यवर्धनासाठी केवळ ग्रेडिंग, पॅकिंग पर्यंतच मर्यादित न राहता प्रक्रिया आणि शीतसाखळीमध्ये अधिक सक्षमतेने काम करण्याची गरज आहे. 

या वेळी सहकार क्षेत्रावरील स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आभार व्ही. सुधीर यांनी मानले.

शेतीतून केवळ ३५ टक्के उत्पन्न 
शेतीमधील उत्पन्न पद्धत (इन्कम पॅटर्न) बदलत असून, शेतीतून केवळ ३५ टक्के उत्पन्न मिळत आहे. इतर क्षेत्रातून ६० टक्के उत्पन्न मिळत आहे. सहकार क्षेत्रावर ४८ कोटी नागरिक अवलंबून आहेत. मात्र सहकार कायद्यात बदल होत नसल्याने सहकार अडचणीत येत आहे. तर कंपनी कायद्यात सारखे बदल होत असल्याने शेतकरी उत्पादक कंपन्या अधिक चांगले काम करू लागले आहेत. सहकारातील कंट्रोल आणि रेग्युलेशनमुळे सहकाराला बदलण्याची गरज आहे, असे सतीश मराठे म्हणाले. 

 


इतर अॅग्रो विशेष
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...
‘पीएम-किसान’मध्ये महाराष्ट्राचा डंका पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत (पीएम-...