Need for movement on water question: Minister Tope
Need for movement on water question: Minister Tope

पाणीप्रश्‍नावर चळवळ उभी राहणे गरजेचे ः मंत्री टोपे

औरंगाबाद : पाण्याची उपलब्धता करून घेण्यासोबतच साठवणूक वाढविणे आवश्यक असून, यासाठी पाणी प्रश्‍नावर चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. कृष्णा खोऱ्यातील साठवणुकीच्या धर्तीवर विचार करावा लागेल. पाणी वितरणासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून औरंगाबाद येथे गुरुवारी (ता. २०) पीक-पाणी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचे उद्‍घाटक म्हणून श्री. टोपे बोलत होते. जलपूजनाने सुरुवात झालेल्या या परिषदेला माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष नितीन पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार उदय राजपूत, प्रा. एच. एम. देसरडा, डाॅ. कल्याण काळे, आमदार अंबादास दानवे, संयोजक माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार रमेश बोरणारे आदींची उपस्थिती होती.

श्री. टोपे म्हणाले, समन्यायी पाणी वाटपाच्या फॉर्मुल्यानुसार आवर्तनासाठी पाणी मिळायला हवे. कृष्णा खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून घेण्याचा प्रश्न जलदगतीने सोडवावा लागेल. कृष्णा खोऱ्यात ५८२ टीएमसी पाणी उपलब्ध होत असताना त्या भागात ७१६ टीएमसी पाणी साठवणुकीची क्षमता निर्माण झाली आहे. पाणी उपलब्ध झाले तरी ते शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी वितरिकांची अवस्था सुधारावी लागेल. सूक्ष्म सिंचन व पाण्याचा कार्यक्षम, पुनर्वापर आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक कठोर कायदे करावे लागतील. त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करावी लागेल. जलसंवर्धनाची मुळंही खोलवर रुजायला हवी, असे मत श्री. टोपे यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com