agriculture news in marathi Need of new markets for Alphanso Mango | Agrowon

हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरज

विजयकुमार चोले
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

पोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस आंब्याचा व्यापार मोजक्या ४ ते ५ व्यापाऱ्यांच्या हाती होता. हळूहळू आंब्याची बाजारपेठ विकसित होत गेली. आजही मुंबई हीच हापूस आंब्याची प्रमुख बाजारपेठ आहे.

पोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस आंब्याचा व्यापार मोजक्या ४ ते ५ व्यापाऱ्यांच्या हाती होता. हळूहळू आंब्याची बाजारपेठ विकसित होत गेली. आजही मुंबई हीच हापूस आंब्याची प्रमुख बाजारपेठ आहे.

वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी जगप्रसिद्ध आणि कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळवून देणारे फळ म्हणजे हापूस आंबा. रत्नागिरी ,सिंधुदुर्ग (देवगड तालुका) हा परिसर हापूस आंब्यासाठी जी आय टॅग म्हणून ओळखला जातो. या प्रदेशातील आंब्याची विशिष्ट चव आणि स्वाद हीच हापूस आंब्याची खासियत आहे.
पोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस आंब्याचा व्यापार मोजक्या ४ ते ५ व्यापाऱ्यांच्या हाती होता. हळूहळू आंब्याची बाजारपेठ विकसित होत गेली. आजही मुंबई हीच हापूस आंब्याची प्रमुख बाजारपेठ आहे. पूर्वीच्या काळी देवगड बंदर आणि विजयदुर्ग परिसरातून आंब्याचा व्यापार चालत असे.

गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर हापूस उत्पादक आजही पारंपरिक बाजारपेठेमध्येच अडकला आहे. बाजारपेठ विस्तारण्याची संधी असुनही पारंपरिक व्यापाऱ्याच्या हातात बाजारपेठ एकवटली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेली हापूस कलमे कोकण तसेच राज्याच्या विविध विभागात पोहोचली. यामुळे विभागनिहाय हवामान, जमीन,व्यवस्थापनामुळे फळाच्या गुणधर्मामध्ये बदल दिसून आला. विभागनिहाय वेगवेगळ्या क्लोनची निर्मिती झाली. भूभाग आणि हवामान सूक्ष्म बदलाला प्रतिसाद देत एकूण नऊ क्लोन तयार झाल्याचे धारवाड कृषी विद्यापीठाच्या एका संशोधनातून समोर आले आहे. या साधम्यामुळे मूळ हापूस जातीला अपेक्षित बाजारभाव आणि मागणीमध्ये अडचणी तयार होताहेत.

व्यवस्थापनात बदलांची गरज 
आंबा बागेत छाटणीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळे पक्वतेचा एकसमान कालावधी आणि पीक व्यवस्थापन साध्य होईल. कारण झाडावरील फांद्या ,पर्णभार,छाटणीच्या नियोजनामुळे सूर्यप्रकाश फळापर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल. त्याचबरोबर रोग ,किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. फांद्या, पर्णभार कमी ठेवल्यास आंबा फळांची उत्कृष्ट गुणवत्ता मिळेल.हापूस आंब्यामध्ये वाहतुकीची मुख्य समस्या आहे. कोरूगेटेड बॉक्स ,फायबर पॅकिंग करताना दोन फळांमध्ये आवरणाचा वापर अजूनही केला जात नाही. परिणामी फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

निर्यातीतील आव्हाने 
हापूस आंबा फळासाठी व्हेपर हिट ट्रीटमेंन्ट या तंत्राचा अवलंब होतो. फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी इरॅडिकेशन सुविधा लागवड क्षेत्रात उभारणे आवश्यक आहे. लागवड क्षेत्रामध्ये वाहतूक आणि पॅकिंगसाठी आधुनिक सुविधा उभारण्याची गरज आहे. हापूस फळांमधील साका ही समस्या गुणवत्तेतील मुख्य अडथळा आहे. फळांमधील साका होण्याची प्रवृत्ती टाळण्यासाठी नव्या संशोधनाची गरज आहे. यामुळे फळे एकसमान पिकतील. चांगल्या दर्जाची गुणवत्ता मिळेल.

संशोधन आणि विकास 
हापूस आंब्यासाठी काढणीपश्चात तंत्रज्ञानावर अधिक संशोधनाची गरज आहे. या संशोधनामुळेच निर्यातीमध्ये वाढ करणे शक्य आहे. साका विकृती निवारण आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा शेतकऱ्यांच्यापर्यंत प्रसार गरजेचा आहे. याचबरोबरीने युरोप गॅप आणि सेंद्रिय लागवड तंत्राचा प्रसार झाला तर उत्पादकांना फायदेशीर ठरेल. याचबरोबरीने प्रक्रिया उद्योगातील आधुनिकीकरणही तेवढेच गरजेचे आहे. लागवड क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी गती द्यावी लागले. लागवड तंत्र आणि व्यवस्थापनातही आधुनिकता आणली तर निश्चितपणे उत्पादनवाढीला चालना मिळेल. आंबा उत्पादक कंपनीची स्थापना केल्यास विविध समस्यांवर मात करता येईल,त्याचबरोबरीने बाजारपेठ विकसित करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील.

संपर्क- विजयकुमार चोले, ९४२०४९६२६०, 
(उपाध्यक्ष, सातारा मेगा फूड पार्क)


इतर अॅग्रोमनी
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दराचा...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या पंधरा...
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...
‘जीआय’प्राप्त उत्पादनांच्या ब्रँडिंगवर...नाशिक : भारतीय शेतीमाल व खाद्यपदार्थांना जगभर...
ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन...सध्या शेतकरी कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर करार...
जळगावच्या सुवर्ण बाजाराला झळाळीजळगाव ः शुद्धता, सचोटीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
सोयाबीनची चाल पाच हजारांकडे  पुणे ः देशांतर्गत बाजारातील कमी आवक, शिकागो बोर्ड...
बेदाणा दरात सुधारणासांगली ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून...
नाईक सूतगिरणीचा कंटेनर निघाला चीन,...पुसद, जि. यवतमाळ : लॉकडाउन काळात पिंपळगाव कान्हा...
बांगलादेशच्या वस्त्रोद्योगात चीनची मोठी...जळगाव ः भारतीय कापसाचा सर्वांत मोठा खरेदीदार...
साखर निर्यात यंदा ठरणार फायदेशीरकोल्हापूर : साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या...
सांगलीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटलीसांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...