नर्सरी कायद्यात सुधारणांची गरज ः डॉ. लदानिया

नर्सरी कायद्यात सुधारणांची गरज ः डॉ. लदानिया
नर्सरी कायद्यात सुधारणांची गरज ः डॉ. लदानिया

अमरावती  ः "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी'' हा संत विचार आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा ठरतो. लिंबूवर्गीय फळांच्या बाबतीत तर रोपांच्या दर्जाची योग्य काळजी घेणे अति गरजेचे असून, त्याकरिता नर्सरी कायद्यामध्ये सुधारणांची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद लदानिया यांनी केले. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, आत्मा यांच्या संयुक्‍त सहकार्याने आयोजीत संत्रा पिकाचे शास्त्रोक्‍त व्यवस्थापन याविषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. आत्मा समितीच्या अध्यक्षा शालिनी चोबीतकर, कृषी उपसंचालक अनिल खर्चाने, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपूते, प्रवीण कुंडलकर यांची या वेळी उपस्थिती होती. डॉ. लदानिया म्हणाले, कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोगविरहित कलमांची गरज आहे. परंतु सध्याच्या नर्सरी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत रोगरहित किंवा प्रादुर्भावग्रस्त रोपांची विक्री होत आहे. त्यामुळे नर्सरी कायद्यात सुधारणांची गरज आहे. गलगल या खुंटावरील कलमा लागवडीसाठी न वापरण्याची सूचना त्यांनी बागायतदारांना केली. फळगळ व सिट्रस ग्रिनींग या रोगांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी व योग्य प्रमाणात कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करण्याचे सांगितले. तसेच उपस्थित संत्रा बागायतदारांना शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत नोंदणी करण्यास प्रोत्साहित केले. तांत्रिक सत्रात डॉ. ए. के. श्रीवास्तव, डॉ. अंबादास हुच्चे, डॉ. ए. के. दास यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कार्यशाळेला व्हिडिओ कॉलिंगद्वारे शुभेच्छा दिल्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे आदी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com