नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज, साठ्याचा ताळमेळ बसेना

नगरः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड होत आहे. तरीही कांदा बियाण्याची गरज आणि साठा, याचा कृषी विभागालाच ताळमेळ नाही.
 Need for onion seeds in Nagar district, stock did not match
Need for onion seeds in Nagar district, stock did not match

नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड होत आहे. तरीही कांदा बियाण्याची गरज आणि साठा, याचा कृषी विभागालाच ताळमेळ नाही. कांदा बियाण्याची गरज किती आहे, सध्या किती बियाणे उपलब्ध आहे, याची काहीही माहिती कृषी विभागाकडे नाही. बियाणे टंचाई झाल्यानंतर आता कुठे कृषी विभागाने माहिती मागवली आहे.  

जिल्ह्यात खरीप, लेट खरीप व उन्हाळी कांद्याची साधारण दरवर्षी एक लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. त्यात ७० ते ८० हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड होते. गेल्यावर्षी कांद्याला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे लागवडी वाढल्या. गतवर्षी एकट्या नगर जिल्ह्यात सुमारे एक लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली. गेल्या सहा महिन्यात कांद्याला दर नाही. मात्र यंदा चांगला पाऊस असल्याने कांद्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. मात्र, बियाणे टंचाईला शेतकरी सामोरे  जात आहेत. 

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट दर देऊनही कांदा बियाणे मिळेनासे झाले आहे. त्यावर उपाय शोधण्याची जबाबदारी कृषी विभागावर आहे. मात्र, जिल्ह्यात कांदा बियाणांबाबत कृषी विभाग उदासीन आहे. ‘‘आम्ही फक्त मोजक्या पिकांचीच अशी माहिती ठेवतो. आता कांदा बियाण्याबाबत माहिती मागवली आहे.’’ असे कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

साठेबाजी होत असल्याची शक्यता 

जिल्ह्यात कांदा बियाण्याची यंदा अधिकची गरज आहे. ते पाहून सुरवातीपासूनच विक्रेते कांदा बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत. गेल्यावर्षी कांदा बिजोत्पादन कमी झाले असेल, परंतु, अजिबातच बियाणे उपलब्ध नाही, असे कसे होऊ शकते? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. मुख्य वितरकांचीच चौकशी करण्याची मागणी होत आहे. बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी तयार केलेल्या समित्याही कांदा बियाणांच्या बाबत गायब झाल्याचे दिसत आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून कांदा बियाण्याची मागणी करत आहोत. मात्र, बियाणे उपलब्ध नसून, लवकर प्राप्त होईल, असे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. शासनाने बियाणे उपलब्ध करणे गरजेचे आहे. - राजेंद्र पालवे, शेतकरी, आखतवाडे, ता. शेवगाव, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com