agriculture news in marathi, Need of policy for Animal feed industry | Page 3 ||| Agrowon

पशुखाद्यनिर्मितीसाठी धोरणात्मक विचार आवश्‍यक
मनोज कापडे
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

राज्यातील शेतकरीवर्ग तोट्यात शेती करीत आहे. त्याला शेती परवडत नाही. त्यामुळेच पशुसंवर्धन क्षेत्रात सतत धडपड करून तो दिवस काढत असतो. पशुसंवर्धनात पुन्हा डेअरी क्षेत्र अतिशय महत्त्वाची भूमिका बाजवत असून, ही डेअरी क्षेत्रातील चढउतार पूर्णपणे पशुआहार बाजारावर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत पशुआहार निर्मिती प्रचंड प्रमाणात महागली असून, पशुखाद्य बाजारात उलथापालथ झालेली आहे.

राज्यातील शेतकरीवर्ग तोट्यात शेती करीत आहे. त्याला शेती परवडत नाही. त्यामुळेच पशुसंवर्धन क्षेत्रात सतत धडपड करून तो दिवस काढत असतो. पशुसंवर्धनात पुन्हा डेअरी क्षेत्र अतिशय महत्त्वाची भूमिका बाजवत असून, ही डेअरी क्षेत्रातील चढउतार पूर्णपणे पशुआहार बाजारावर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत पशुआहार निर्मिती प्रचंड प्रमाणात महागली असून, पशुखाद्य बाजारात उलथापालथ झालेली आहे.

पशुखाद्य निर्मितीसाठी मुखत्वे कच्चा माल म्हणून मका लागतो. पशुखाद्य तयार करण्यासाठी आधी प्रतिक्विंटल १२०० ते १३०० रुपये दराने मका खरेदी केली जात होती. हा दर अनेकदा परवडत नाही. मात्र, शेतकरी वर्गाला हातभार लावण्यासाठी या दरालादेखील कोणी विरोध केला नाही. परंतु, मक्याचे अभूतपूर्व शॉर्टेज तयार झाले आणि अगदी २६००-२७०० रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी करण्याची वेळ पशुखाद्य निर्मिती उद्योगावर आली. यातून भरमसाट तोटा वाढला. पशुखाद्य बाजारात दर वाढले. त्याचा फटका पशुपालक व दूध उत्पादक शेतकरी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे स्वस्त मक्याची आयात तातडीने झाली पाहिजे.

पशुखाद्य निर्मितीसाठी दुसरा महत्त्वाचा मुद्दा महागड्या डीओसीचा म्हणजे तेलपेंडचा आहे. सोयाबीन, मोहरी, शेंगदाणे, सूर्यफूल याची तेलपेंड वापरली तरच दर्जेदार पशुआहार तयार होतो. कितीही महागले तरी तेलपेंड आम्ही योग्य प्रमाणात पशुखाद्य तयार करताना टाकतो. त्यामुळे जनावरे अधिक गुणवत्तापूर्ण दूध तयार करण्यात यशस्वी होतात.

तेलपेंड बाजारातील सर्वांत गंभीर बाब म्हणजे गेल्या काही दिवसांत आम्हाला प्रतिक्विंटल १९००-२००० ऐवजी ३८०० ते ३९०० रुपये दराने तेलपेंड खरेदी करावी लागते आहे. यामुळे पशुखाद्य कारखान्यांचे तोटे वाढत गेले. अर्थात, त्यामुळेच पशुखाद्याचे भाव वाढून पशुपालक शेतकरी वर्गाच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. पशुखाद्य निर्मितीमधील कच्च्या मालाची दरवाढ डेअरी प्रमाणेच पोल्ट्री उद्योगाला प्रचंड प्रमाणात नुकसान करणारी ठरते आहे. राज्यकर्त्यांना या घडामोडींची माहिती असायला हवी व धोरणात्मक सुधारणा करायला हव्यात.

सर्व प्रथम सोयापेंड निर्यात अनुदान तातडीने रद्द करण्याची गरज आहे. कारण, अनुदान रद्द केल्याशिवाय देशी बाजारात उपलब्धता अजिबात वाढणार नाही. त्यामुळे पशुखाद्य दरदेखील कमी होणार नाहीत. माझ्या मते मक्याची आयातदेखील वाढविणे गरजेचे आहे. कारण देशी बाजारात पशुखाद्य निर्मितीसाठी आयात मका प्रतिक्विंटल १२०० ते १३०० रुपये दराने उपलब्ध झाला, तर हा गुंता थोडा सुटेल. या दरात मका राहिल्यास शेतकरी वर्गालादेखील पीक परवडते. या दरात पशुखाद्यनिर्मिती करण्यासाठी मका घेणे डेअरी व पोल्ट्री उद्योगलाही परवडणारे असेल. मका आणि तेलपेंड उपलब्धता भरपूर प्रमाणात असेल तरच पशुखाद्य दर संतुलित राहतील. दूध उत्पादनाचा खर्च मर्यादित राहील.

- दशरथ माने,
अध्यक्ष, सोनई डेअरी उद्योग समूह 

इतर अॅग्रो विशेष
मुल्ला यांच्या शेतात पिकतो वर्षभर...वर्षभर मागणी असलेल्या, कमी जोखीम व देखभाल...
ग्रेटाचा सवाल : तुमची हिंमत तरी कशी...गत वर्ष दीड वर्षाच्या अल्प काळात स्वीडनच्या...
पीकविम्याकडून ‘द्राक्ष कोंडी’; मोठे...पुणे : हवामान आधारित पीकविम्यात द्राक्षाकरिता...
आता मदार रब्बीवरबऱ्याच दिवसांनंतर हवामान विभागाकडून एक सुखद अंदाज...
शेळी-मेंढी विकासात ‘नारी’च अग्रेसरउपासनी समितीस आढळून आले, की ऑक्टोबर २०००   ...
पीकहानीचा वस्तुस्थितिदर्शक अहवाल...पुणे  : राज्यात अतिपावसामुळे झालेल्या...
हापूसचा हंगाम दोन महिने लांबला; २५...रत्नागिरी : प्रतिकूल वातावरणाचा परिणाम संवेदनशील...
गाव तसे छोटे, कामांतून झाले मोठेपूर्णा नदीच्या खोऱ्यात सर्वत्र खारपाणपट्टा...
देशी साहिवाल गायीच्या दुधाची देसिको...महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमाभागावर...
सामूहिक शक्तीतून ‘श्रीराम’ गटाची...तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील श्रीराम शेतकरी...
राज्यात पीकहानी ३५ हजार कोटींवरपुणे : अतिपावसामुळे राज्यात आत्तापर्यंत फळबागांसह...
शेळ्या-मेंढ्यांच्या उत्पादनवाढीचा...‘काटक माडग्याळ मेंढीचे होणार संवर्धन - सांगली...
शेतीसाठी नोकरी सोडली, आता बागही गेलीअंबासन, जि. नाशिक : वरुणराजा आता बस झालंय......
सत्तर लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन...मुंबई : राज्यात रब्बीच्या क्षेत्रामध्ये २२ टक्के...
‘महा’चक्रीवादळ किनारपट्टीला आज धडकणारपुणे: अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची...
शनिवारपासून पावसाची उघडीप शक्यपुणे  : ‘महा’ चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर व...
आपत्ती नव्हे चेतावणीअवकाळी पावसाने घातलेल्या थैमानामुळे हातातोंडाशी...
मनस्ताप की दिलासाएका पाठोपाठ एक निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाने...
मराठवाड्यात ऑक्‍टोबरअखेर ६४ टक्‍क्‍...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघू, मध्यम,...
निर्जलीकरण केलेल्या भाज्यांपासून...विविध भाजीपाला, फळे यांच्यावर तांत्रिक पद्धतीने...