इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य देण्याची गरज : परिचारक

इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य देण्याची गरज : परिचारक
इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य देण्याची गरज : परिचारक

अकलूज, जि. सोलापूर : चालू वर्षी देशात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार असून, त्यामुळे साखरेचे दर घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीला सर्वाधिक प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवारी (ता. १८) व्यक्त केले.

श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक, कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी, संचालक दिनकरराव मोरे, दिलीपराव चव्हाण, नामदेव झांबरे, हरीश गायकवाड, शिवाजीराव साळुंखे, ज्ञानदेव ढोबळे, नागनाथ शिंदे, सुरेश आगावणे, बाळासो कवडे, महेबूब शेख, बाळासो यलमार, शिवाजी गवळी, तानाजी वाघमोडे, आनंदराव आरकिले, परमेश्वर गणगे, सिंधू पवार, पार्वती नरसाळे, संगीता पोरे, भीमराव फाटे, अरुण घोलप उपस्थित होते.

परिचारक म्हणाले, ‘‘सरकारने साखर कारखानदारी सक्षम करण्यासाठी इथेनॉलनिर्मितीला चालना देण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे. बी हेवी इथेनॉलला यापुढे लिटरला ५२ ते ५९ रुपये दर जाहीर केला जाणार आहे. पेट्रोलमध्ये २० टक्‍क्‍यांपर्यंत इथेनॉल मिसळले जाणार असून, त्यामुळे पेट्रोलचे दर नियंत्रित होण्यास मदत होईल.``

कारखान्यात ठेवी ठेवण्यासाठी सभासदाना आवाहन केले. अशा ठेवींवर बॅंकेपेक्षा एक टक्का जादा व्याज दर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कारखान्याचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी प्रास्तविक केले. यशवंत कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com