Need to protect water supply resources: Dr. Sanjay Chahande
Need to protect water supply resources: Dr. Sanjay Chahande

पाणीपुरवठ्यांच्या स्रोतांचे संरक्षण गरजेचे ः डॉ. संजय चहांदे

राज्यात अस्तित्वात असलेल्या सुमारे ३७ हजार पाणीपुरवठ्याच्या स्रोतांचे संरक्षण होण्याची गरज आहे. स्रोतातील पाण्याच्या शाश्‍वततेकरिता अधिकाधिक भूजल व्यवस्थापनाकरिता प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी व्यक्त केले.

पुणे ः राज्यात अस्तित्वात असलेल्या सुमारे ३७ हजार पाणीपुरवठ्याच्या स्रोतांचे संरक्षण होण्याची गरज आहे. स्रोतातील पाण्याच्या शाश्‍वततेकरिता अधिकाधिक भूजल व्यवस्थापनाकरिता प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी व्यक्त केले.

अटल भूजल योजनेअंतर्गत सर्व अशासकीय संस्था तसेच अंमलबजावणी यंत्रणा, जागतिक बँक प्रतिनिधी आणि केंद्र शासनाचे या योजनेअंतर्गत कार्यरत असलेले अधिकारी यांची चर्चा घडवून आणण्याकरिता राज्य समन्वय व अंमलबजावणीकरता नियुक्त भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारचे उद्‍घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (ता. ५) झाले. या वेबिनारमध्ये युनिसेफ, भूजल क्षेत्रात कार्यरत विविध संस्था अक्वाडॅम, प्रायमूव्ह, पाणी फाउंडेशन यांची उपस्थिती होती. याबरोबरच यशदा, पुणे आणि कर्नाटक राज्यांतील अटल भूजल योजनेतील अधिकारी सहभागी झाले होते.

डॉ. चहांदे म्हणाले, की राज्यात अटल भूजल योजना व जलजीवन मिशन या दोन्हींच्या माध्यमातून पेयजल टंचाईवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान आधारित उपाययोजना तसेच सूक्ष्म नियोजनाची आवश्यकता आहे. याबरोबरच शासनाच्या कृषी, जलसंधारण, सिंचन इत्यादी विभागांनी एकत्रित येऊन भूजल व्यवस्थापनाकरिता आराखडा तयार करून त्यावर अंमलबजावणी करावी.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, की भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत घसरण होत आहे. भूजल व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी अटल भूजल योजना राज्यात १ एप्रिल २० पासून राबविण्यास सुरुवात झाली आहे.

यावर करावे लागणार काम तंत्रशुद्ध माहिती, शिक्षण आणि संवाद आराखडा, कोअर चमुची स्थापना, एकाकेंद्राभिमुखता, पेयजलास प्राधान्य, भूपृष्ठीय आणि भूजल संयुक्त वापर, प्रभावी क्षमता बांधणी, व्यापक जनजागृती, शास्त्रीय माहितीचा सुयोग्य वापर, असे महत्त्वाचे मुद्दे वेबिनारच्या माध्यमातून पुढे आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com