पुणे विभागात पाणीटंचाई दूर होण्यासाठी जोरदार पावसाची आवश्‍यकता

पाणीटंचाई दूर होण्यासाठी जोरदार पावसाची आवश्‍यकता
पाणीटंचाई दूर होण्यासाठी जोरदार पावसाची आवश्‍यकता

पुणे  : पुणे भागातील दुष्काळी पट्ट्यात पूर्वमोसमी पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. मात्र, अद्यापही पाणीटंचाईची तीव्रता कायम आहे. ती दूर होण्यासाठी आणखी जोरदार पावासची आवश्‍यकता आहे. विभागातील २० तालुक्यांमधील ८९ गावांना आणि ३४३ वाड्यांना ७५ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

विभागात यंदा सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ४१ टॅंकर सुरू अाहेत. खटाव, माण, कोरेगाव, पाटण, महाबळेश्‍वर, खंडाळा तालुक्‍यांसह ११ गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. जिल्ह्यातील ५३ गावे १३२ वाड्यांमधील ६१ हजार लोकसंख्या आणि १३ हजार जनावरांना टॅंकरने पाणीपुरवठा पुरवावा लागत आहे. मान तालुक्यातील १ आणि महाबळेश्‍वर तालुक्यातील २ टॅंकर बंद झाले आहेत. पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईत थोडी वाढ झाली असून, आंबेगाव, जुन्नर, खेड, भोरसह नऊ तालुक्‍यांतील ३१ गावे २०८ वाड्यांना ३१ टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे, तर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्‍यातील ५ गावे  एका वाडीला तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या दुर्गम भागात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन स्राेत अधिग्रहित करण्यात आले आहेत, तर सोलापूर जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई भासली नाही. विभागातील टॅंकरद्वारा पाणीपुरवठ्याची स्थिती

  • सातारा : जावळी १२, माण ९, खटाव ६, कोरेगाव ७, महाबळेश्‍वर १, पाटण २, वाई २, कराड १, खंडाळा १
  • पुणे : आंबेगाव ७, जुन्नर ६, खेड ५, भोर ३, बारामती ३, पुरंदर ३, वेल्हा २ दौंड १, मुळशी १.
  • सांगली : खानापूर ३
  • विभागातील पाणीटंचाईची स्थिती

    जिल्हा    गावे वाड्या लोकसंख्या पशुधन टॅंकर
    पुणे   ३१ २०८  ५९९७४ ०  ३१
    सातारा ५३  १३२ ६१६४८ १३१२३   ४१
    सांगली ५  ६७८२ ० 
    कोल्हापूर  ०    २ ६७१   २९०  ०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com