agriculture news in marathi, need for soil conservation in state | Agrowon

‘मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती आवश्यक’

माणिक रासवे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

परभणी : विविध प्रकारच्या प्रदूषणमुळे मातीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म बिघडून जमिनीची सुपीकता कमी होत आहे. मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने दक्ष राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जाणार आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सय्यद ईस्माइल यांनी दिली.

परभणी : विविध प्रकारच्या प्रदूषणमुळे मातीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म बिघडून जमिनीची सुपीकता कमी होत आहे. मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने दक्ष राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जाणार आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सय्यद ईस्माइल यांनी दिली.

जागतिक मृदा दिनानिमित्त बोलताना डॉ. ईस्माइल म्हणाले, की वाढते मृदा प्रदूषण थांबावे यादृष्टीने यंदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेचे (एफएओ) ‘बी द सोल्यूशन टू साॅइल पोल्यूशन’ (करून मातीचे रक्षण थांबेल प्रदूषण) ही संकल्पना आहे. रासायनिक खते, कीटकनाशकांचा असंतुलित वापर, विविध कारखान्यांतून निघणारे टाकाऊ पदार्थ यामध्ये औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून सोडली जाणारी राख, साखर कारखान्यातील स्पेंट वाॅश, रासायनिक खतनिर्मिती कारखान्यातून निघणारे अॅसिड, मनुष्यनिर्मित टाकाऊ घटक, घनकचरा, प्लॅस्टिक, सांडपाणी आदी कारणांनी माती प्रदूषित होत आहे.

नत्रयुक्त खतांच्या अतिरेकी वापरामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होते. लहान मुलांमध्ये ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ विकृती आढळून येते. पिकांमधील नत्र स्थिरीकरण प्रक्रिया मंदावते. कीटकनाशके, तणानाशकांच्या असंतुलित वापरामुळे मातीमधील जैविक घटक तसेच इतर जीवसृष्टी धोक्यात आली आहे. शहरातील टाकाऊ पदार्थ, घनकचरा, कर्करोगास कारणीभूत जड धातू आदी घटकांमुळे विविध प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

प्लॅस्टिकयुक्त कचरा जमिनीत गेल्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म बिघडले आहेत. त्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो. परिणामी उत्पादकता कमी होते. मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर कमी करावा लागेल. मातीचा दर्जा सुधारण्यासाठी जैविकरीत्या विघटित होणाऱ्या घटकांचा वापर करावा लागेल, असे डॉ. ईस्माइल यांनी सांगितले.

''जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळखताचा वापर आवश्यक आहे. मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती केली जाणार आहे.''
- डॉ. सय्यद ईस्माइल,
विभागप्रमुख, मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र, वनामकृवि, परभणी.


इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...
निकृष्ट बियाणे पुरवठादार कंपन्यांवर...अमरावती: निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठा प्रकरणात...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक...मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या...
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...