Agriculture news in Marathi, Need to solve mango fruit crop insurance question | Agrowon

काजू, आंबा फळपीक विमा प्रश्‍न तडीस नेण्याची गरज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

रत्नागिरी ः फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा, काजू बागायतदारांना योग्य लाभ मिळाला नसल्याच्या तक्रारी रत्नागिरी जिल्ह्यात पुढे आल्या आहेत. एकाच मंडळातील बागायतदारांना वेगवेगळे निकष लावून लाभांश नाकारण्यात आल्याची तक्रार आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांनी केली आहे. मात्र, त्यांना विमा कंपनीकडून सहकार्य मिळाले नाही. मुंबईत विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेने दंड थोपटले होते. मात्र, रत्नागिरीतील आंबा बागायतदारांच्या प्रश्‍नासाठी स्थानिक शिवसैनिक प्रश्‍न तडीस नेणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

रत्नागिरी ः फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा, काजू बागायतदारांना योग्य लाभ मिळाला नसल्याच्या तक्रारी रत्नागिरी जिल्ह्यात पुढे आल्या आहेत. एकाच मंडळातील बागायतदारांना वेगवेगळे निकष लावून लाभांश नाकारण्यात आल्याची तक्रार आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांनी केली आहे. मात्र, त्यांना विमा कंपनीकडून सहकार्य मिळाले नाही. मुंबईत विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेने दंड थोपटले होते. मात्र, रत्नागिरीतील आंबा बागायतदारांच्या प्रश्‍नासाठी स्थानिक शिवसैनिक प्रश्‍न तडीस नेणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

फळपीक विमा योजनेअंतर्गत १ जानेवारी ते ३१ मे २०१९ या कालावधीकरिता कोतवडे, खेडशी व पावस मंडळातील (ता. रत्नागिरी) फळबागांची विमा रक्कम २८ डिसेंबर २०१९ ला दि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडे वर्ग केली. कंपनीच्या कोकणातील प्रतिनिधींकडे चौकशी केल्यानंतर पीकविम्याविषयी पुणे येथून कार्यवाही होत असल्याचे सांगण्यात आले. पुणे येथे संपर्क होऊ शकला नाही. तसेच कंपनीच्या स्कायमेट हवामान केंद्राकडून मंडळनिहाय माहिती (डाटा) रत्नागिरीतील आंबा, काजू व्यावसायिकांना दिली गेली नाही. ३१ मे २०१९ नंतर विमा मुदत संपते. पुढील ४५ दिवसांत शासन निर्णयाप्रमाणे इन्शुरन्स क्लेम मंडळनिहाय माहितीनुसार शेतकऱ्याच्या खात्यात मंजूर रक्कम वर्ग करणे जरुरीचे आहे. चार महिने होऊनही दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि स्कायमेट हवामान केंद्राकडून फळपीक विमा योजनेअंतर्गत मंजूर नुकसानभरपाई दिलेली नाही. याबाबत माहिती विचारण्यास गेल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. 

पुढील वर्षाच्या फळपीक विमा भरण्याची वेळ आली असतानाही मागील वर्षाच्या फळपीक विम्याबाबत कोणतीही उचित कार्यवाही झालेली नाही. मंडळनिहाय कमाल, किमान तापमान व पाऊस झाल्याप्रमाणे बाधीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. हवामान केंद्राकडील आकडेवारी जाहीर केल्यावर कंपनीकडून होत असलेला गोलमाल उघड होणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले आहे.

इतर बातम्या
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
चांद्रयान मोहिमेसाठी निधी देणार ः...आटपाडी ः भारतीय अवकाश संशोधन संस्थेला या पुढच्या...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...