agriculture news in marathi, Need of structural development of value chain in agriculture sector | Page 2 ||| Agrowon

तालुकानिहाय मूल्यवर्धन साखळीचे आराखडे हवेत : योगेश थोरात
योगेश थोरात, महाएफपीसी, पुणे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

राज्यातील शेती आणि शेतकरी संक्रमणावस्थेतून जात असल्याने राजकीय पक्षांकडून आणि येणाऱ्या सरकारकडून या निमित्ताने मोठी अपेक्षा आहे. राज्यातील लहान व छोट्या शेतककऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संस्थात्मक स्वरूपावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळ देणे आवश्यक आहे.

राज्यातील शेती आणि शेतकरी संक्रमणावस्थेतून जात असल्याने राजकीय पक्षांकडून आणि येणाऱ्या सरकारकडून या निमित्ताने मोठी अपेक्षा आहे. राज्यातील लहान व छोट्या शेतककऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संस्थात्मक स्वरूपावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळ देणे आवश्यक आहे.

परस्पर सहकार्य तत्त्वाने शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी दीर्घकालीन रचनात्मक काम करण्याची गरज आहे. केवळ निवडणुकांपुरते, लोकप्रिय घोषणांकरून शेतकऱ्यांनी आकृष्ट करण्यापुरत्या या घोषणा राहू नयेत. शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मूल्यवर्धन साखळीत आणून शेतकऱ्यांना मासिक शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठीच्या दीर्घकालीन योजना आखाव्या लागणार आहेत. यासाठी प्रामुख्याने राज्यात नव्याने किमान १५ हजार शेतकरी उत्पादक कंपन्या नव्याने स्थापन करणे, राज्य व केंद्र शासनाच्या कृषी व ग्रामविकास केंद्रित योजनांचे समन्वयन करून शासकीय योजना प्रभावीपणे राबविणे, शेती उद्योग विकसित करण्यासाठी रस्ते, शाश्‍वत वीज, पाणी या मूलभूत सुविधा पुरविणे, सार्वजनिक खाजगी गुंतवणुकीद्वारे एकात्मिक कृषी विकासासाठी गुंतवणूक आणणे, एकात्मिक शेती पद्धतीचा दृष्टिकोन अवलंबणे, कृषी व तत्सम बाजारांचे विकेंद्रीकरण व बाजार जोडणी या मूलभूत उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याचबरोबर कृषी व्यवसायासाठी अल्प दरात सुलभरीत्या कर्जपुरवठादेखील आवश्यक आहे.

राजकीय पक्ष व उमेदवारांकडून तात्पुरत्या स्वरूपाची जुजबी स्वरूपाच्या घोषणा करण्याऐवजी आपल्या तालुकानिहाय मूल्यवर्धन साखळीचे आराखडे करण्याची गरज आहे. निवडणुकांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर जनजागृती द्वारे शेतकऱ्यांची मानसिकता बदलवून समृद्ध अशा शेतीचे आशादायी चित्र जनतेसमोर उभे करणे आवश्यक आहे.
- योगेश थोरात, महाएफपीसी, पुणे

इतर बातम्या
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर :...‘लोकांच्या डोळ्यांवर धर्मांधतेची झापड चढविण्यात...
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
कर्जफेडीची क्षमता देणाऱ्या धोरणांची गरजविधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राजकीय...
महामंडळाने ‘उद्योग’ बंद केले तरच विकासराज्यातील कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी ‘...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर...नाशिक : जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...