पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत देणार : पालकमंत्री देशमुख

पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत देणार : पालकमंत्री
पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत देणार : पालकमंत्री

सोलापूर : ‘‘वीर आणि उजनी धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, पूरग्रस्तांन आवश्यक ती मदत करण्यात येईल’’, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.

पुरामुळे पंढरपूर येथील रामबाग येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्तांची पालकमंत्री देशमुख यांनी भेट घेतली. या वेळी आमदार प्रशांत परिचारक, आमदार भारत भालके, नगराध्यक्षा साधना भोसले, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार मधूसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत महानोर, नगरसेवक आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, ‘‘पुणे परिसरात मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने वीर व उजनी धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे निरा व भीमा नदी काठच्या गावांत व पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी काठच्या भागात पाणी आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरपरस्थितीमुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना प्रशासनामार्फत आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. त्यांची कोणतेही गैरसोय होणार नाही. त्यांना लागेल ती मदत तातडीने पुरवण्यात येईल.’’  

प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पूरग्रस्तांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली. त्यामध्ये आरोग्य विभागाकडून औषधोपचार, स्वच्छ पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, पुरवठा विभागामार्फत धान्य व केरोसिन वाटप आदीबाबतीची माहिती दिली. आवश्यक तत्काळ मदतीसाठी प्रशासनातील सर्व विभाग सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. 

देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शिरढोण, कौठाळी  गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com