कडुलिंबाची झाडे वाळू लागली 

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून शेतातील कडूलिंबाच्या झाडांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. झाडे जागीच करपून जळून जाऊ लागली आहेत.
The neem trees began to dry up
The neem trees began to dry up

पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून शेतातील कडूलिंबाच्या झाडांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. झाडे जागीच करपून जळून जाऊ लागली आहेत. कृषी विभाग, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नेमक्या कोणत्या रोगामुळे कडुलिंबाची झाडे जळून जात आहेत, याचा शोध घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  ग्रामीण भागात बांधावर व बहुतांश ठिकाणी कडुलिंबाची झाडे आहेत. गुणकारी म्हणून कडूलिंबाचा उल्लेख केला जातो. साधारणपणे कडूलिंबाच्या झाडांवर फारसा रोग पडत नाही. झाडीचे नुकसानही होत नाही. मात्र नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रक व परिसरात अलीकडे काही दिवसांपासून कडूलिंबाच्या झाडावर अज्ञात रोग पडत असून, काही दिवसांत झाड जागीवर पिवळे पडून करपते, नंतर जागेवरच जळून जात आहे. खरे तर कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांच्या ही बाब निदर्शनात यायला हवी. पण त्याकडे लक्ष दिल्याचे दिसत नाही. मध्यंतरी डाळिंबावर स्पीनव्होल बोरर या कीटकाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे झाडे जागेवर करपून वाळत होती. हा त्यापैकी एक रोग आहे की, अन्य कोणत्या रोगाला, किडीला कडुलिंबाची झाडे बळी पडत आहेत, याचा शोध घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी सतीश डावकर यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com