Agriculture News in Marathi The neem trees began to dry up | Page 4 ||| Agrowon

कडुलिंबाची झाडे वाळू लागली 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून शेतातील कडूलिंबाच्या झाडांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. झाडे जागीच करपून जळून जाऊ लागली आहेत.

पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून शेतातील कडूलिंबाच्या झाडांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. झाडे जागीच करपून जळून जाऊ लागली आहेत. कृषी विभाग, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नेमक्या कोणत्या रोगामुळे कडुलिंबाची झाडे जळून जात आहेत, याचा शोध घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

ग्रामीण भागात बांधावर व बहुतांश ठिकाणी कडुलिंबाची झाडे आहेत. गुणकारी म्हणून कडूलिंबाचा उल्लेख केला जातो. साधारणपणे कडूलिंबाच्या झाडांवर फारसा रोग पडत नाही. झाडीचे नुकसानही होत नाही. मात्र नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रक व परिसरात अलीकडे काही दिवसांपासून कडूलिंबाच्या झाडावर अज्ञात रोग पडत असून, काही दिवसांत झाड जागीवर पिवळे पडून करपते, नंतर जागेवरच जळून जात आहे. खरे तर कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांच्या ही बाब निदर्शनात यायला हवी. पण त्याकडे लक्ष दिल्याचे दिसत नाही.

मध्यंतरी डाळिंबावर स्पीनव्होल बोरर या कीटकाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे झाडे जागेवर करपून वाळत होती. हा त्यापैकी एक रोग आहे की, अन्य कोणत्या रोगाला, किडीला कडुलिंबाची झाडे बळी पडत आहेत, याचा शोध घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी सतीश डावकर यांनी केली आहे. 


इतर बातम्या
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
वीज प्रश्नांवर मार्ग काढू : भुजबळनाशिक : ‘‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
जळगाव, अमळनेर, चोपडा बाजारात मक्याचे दर...जळगाव ः  जिल्ह्यातील जळगाव, चोपडा व...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...
मनमाडमध्ये वाढत्या थंडीमुळे दूध...मनमाड, ता. नांदगाव : गेल्या काही दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जाची मर्यादा...सोलापूर ः शेतीचे अपेक्षित उत्पन्न आणि हवामानाचा...
जळगावात ‘वाळू माफियाराज’जळगाव ः जिल्ह्यात विशेषतः जळगाव तालुक्यातील सर्वच...