नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते ४८०० रुपये 

नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते ४८०० रुपये 
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते ४८०० रुपये 

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे. गेल्या सप्ताहात २५४ क्विंटलची आवक झाली आहे. बाजार समितीत तुरीला ४४०० ते ४८०० रुपये दर मिळाला आहे. ज्वारीची आवक मात्र अजून फारशी वाढली नाही. सोयाबीन, गहू, मूग, हरभऱ्याची आवकही सुरूच आहे. भाजीपाल्याची मागणीही वाढली आहे. 

नगर बाजार समितीत सप्ताहभरात दीड हजार क्विटंल भुसार मालाची आवक झाली. गावराण ज्वारीची ४६ क्विंटलची आवक होऊन २१०० ते २७०० रुपये दर मिळाला. हरभऱ्याची १८० क्विंटलची आवक होऊन ४१०० रुपये सरासरी दर मिळाला. मुगाची २०४ क्विंटलची आवक झाली. मुगाला ४५०० ते ५५०० रुपये दर मिळाला. लाल मिरचीचीही बऱ्यापैकी आवक होत आहे. लाल मिरचीची १६९ क्विंटलची आवक होऊन ४७०० ते ८५०० रुपये दर मिळाला. 

गव्हाची २०२ क्विंटलची आवक होऊन २००० ते २१०० रुपयांचा दर मिळाला. गुळडागाची ५८४३ क्विंटलची आवक झाली. गुळडागाला २२०० ते २८०० रुपये दर मिळाला. मकाची आकरा क्विटंलची आवक होऊन १७०० रुपये दर मिळाला. सोयाबीनची अजूनही बाजारात बऱ्यापैकी आवक सुरू आहे. गेल्या आठवडाभरात सोयाबीनची ५५८ क्विंटलची आवक होऊन ३६०० ते ३६२५ रुपये दर मिळाला. उडदाची ६४ क्विंटलची आवक झाली. उडदाला ३९०० ते ४३०० रुपये दर मिळाला. 

भाजीपाल्यात गवार, टोमॅटो, फ्लाॅवर, मेथी, पालक, काकडी, हिरवी मिरची, ढोबळी मिरची आदीसह भाजीपाल्याला चांगली मागणी राहिली. मात्र, नेहमीच्या तुलनेत गेल्या आठवड्यात काही प्रमाणात आवक कमी झाल्याने दरात तेजी होती, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. किरकोळ बाजारात त्यामुळे भाजीपाल्याचा दरात चाळीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली. सर्वाधिक गवारला १२० ते १४० रुपये प्रती किलो किरकोळ बाजारात दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com