सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निव्वळ उत्पन्न सव्वातीन कोटी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निव्वळ उत्पन्न सव्वातीन कोटी
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निव्वळ उत्पन्न सव्वातीन कोटी

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षात बाजार समितीला १७ कोटी ८० लाख ३७ हजारांचे उत्पन्न मिळाले. त्यापैकी १४ कोटी ५८ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. त्यात ८ कोटी ५४ लाख रुपये केवळ आस्थापनेवर खर्च झाला आहे. या सर्व व्यवहारातून  निव्वळ उत्पन्न (वाढावा) ३ कोटी २१ लाख ४८ हजार रुपये बाजार समितीच्या तिजोरीत शिल्लक आहेत. 

बाजार समितीचे सभापती तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीची वार्षिक सभा सोमवारी (ता. ९) झाली. उपसभापती श्रीशैल नरोळे, संचालक दिलीप माने, बाळासाहेब शेळके, जितेंद्र साठे, बसवराज इटकळे आदी उपस्थित होते. 

बाजार समितीच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षात बाजार शुल्क ११ कोटी ८० लाख रुपये, परवाना शुल्क ३ लाख ८६ हजार, प्लॉट भाडे ८ लाख ९९ हजार, वजनकाटा भाडे २३ लाख ३७ हजार, व्याज ४ कोटी ६८ लाख ३९ हजार, इतर उत्पन्न ६८ लाख ४ हजार रुपये असे एकूण १७ कोटी ८० लाख ३७ हजार रुपयांचे उत्पन्न बाजार समितीला मिळाले. त्यापैकी मानधन, प्रशासन, आस्थापना आदी खर्चावर १४ कोटी ५८ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च झाला.

देशमुख म्हणाले, "बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम सुरू आहे. यापुढेही बाजार समितीकडून शेतकऱ्यांचा अधिकाधिक फायदा कसा होईल, याकडे लक्ष देऊ. कांदा निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. तसेच रस्ते आणि वीजेची पुरेशी सोय आणि शेतमालाला संरक्षण यावरही भर देण्यात येत आहे.’’

‘‘दोन हजार मेट्रिक टनापर्यंतच्या शीतगृह प्रकल्पाबाबतही प्रयत्न सुरू आहेत. ईनाम व्यवहाराबाबतही कार्यवाही सुरू आहे. शक्‍य तेवढ्या लवकर सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात येईल,'''' असेही त्यांनी सांगितले.

बाजार समितीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच सभा होती. त्यामुळे अनेक संचालक उत्सुकेतपोटी उपस्थित होते. पण तुलनेने शेतकऱ्यांची संख्या फारच कमी होती. या सभेबाबत अनेक शेतकऱ्यांना माहिती नव्हती, असे दिसले. त्यामुळे सभेचे कामकाज अवघ्या काही वेळात संपले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com