agriculture news in marathi, Netherland and india to work on indigenious cow variety development | Agrowon

देशी गोवंश सुधार प्रकल्पाची २५ मे रोजी पायाभरणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 मे 2018

बारामती : नेदरलॅंडच्या सहकार्याने व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सेंटर फॉर एक्सलंस डेअरी हा देशातील एकमेव प्रकल्प बारामतीत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत उभारला जाणार आहे. त्याची पायाभरणी येत्या २५ मे रोजी माळेगाव येथे होणार आहे.

बारामती : नेदरलॅंडच्या सहकार्याने व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सेंटर फॉर एक्सलंस डेअरी हा देशातील एकमेव प्रकल्प बारामतीत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत उभारला जाणार आहे. त्याची पायाभरणी येत्या २५ मे रोजी माळेगाव येथे होणार आहे.

२५ मे रोजी माळेगाव येथे सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नेदरलॅंडचे उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सौ. सुप्रिया सुळे, प्रधान सचिव विजयकुमार, पशुसंवर्धन सचिव डॉ. कुरुंदकर, आयुक्त कांतिलाल उमाप, राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार व सर्व विश्वस्त या वेळी उपस्थित राहणार आहेत. 

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून हा देशातील एकमेव गोवंश सुधार प्रकल्प होणार आहे. हा प्रकल्प होण्यासाठी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे यांनी नेदरलॅंड सरकारशी चर्चा करून तेथील डेअरी तंत्रज्ञान देशात आणण्यासाठी सादरीकरण केले होते. त्यानुसार नेदरलॅंड व महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पास मान्यता दिली.

या प्रकल्पात देशी गीर गायी, पंढरपूर म्हशीवर संशोधन होणार आहे. दूध, शेण व गोमूत्रावर येथे संशोधन होणार असून, देशी उत्पादनाचे ब्रॅंडिंग होण्यास यामुळे मदत होणार आहे. ब्राझीलप्रमाणेच उत्तम व दर्जेदार गायी तयार होण्यासाठीही येथे संशोधन होणार आहे. या प्रकल्पाचे काम प्रकल्पप्रमुख डॉ. धनंजय भोईटे, प्रकल्प प्रभारी प्रा. नीलेश नलावडे पाहणार आहेत. 

सेंटर फॉर एक्सलन्स डेअरीची मुख्य उद्दिष्टे

  • पशुसंगोपन प्रात्यक्षिके.
  • गाई, म्हशींची प्रजननक्षमता वाढीसाठी कृत्रिम रेतन प्रणाली विकास.
  • वंशसुधार व प्रतिदिनी दूध क्षमतेत वाढ.
  • रोग प्रतिकारकशक्ती व आहार व्यवस्थापनाचे उच्च तंत्र
  • संकरित गायींसाठी उष्ण कटिबंधानुसार गोठा बांधणी
  • देशी गाय-म्हशींसाठी आदर्श गोठानिर्मिती
  • पशुसंवर्धन व दुग्धविकासासाठी शेतकरी प्रशिक्षण
  • मोबाईल अॅपद्वारे संशोधनाची माहिती प्रसार 

इतर अॅग्रो विशेष
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...