नेदरलँडचे प्रा. गर्ट यान डॉइवज यांची डॉ. डी. वाय. पाटील संकुलास भेट

नेदरलँडचे प्रा. गर्ट यान डॉइवज यांची डॉ. डी. वाय. पाटील संकुलास भेट
नेदरलँडचे प्रा. गर्ट यान डॉइवज यांची डॉ. डी. वाय. पाटील संकुलास भेट

कोल्हापूर : नेदरलँड विद्यापीठाचे प्रा. गर्ट यान डॉइवज यांनी डॉ. डी. वाय. पाटील संकुलास नुकतीच भेट दिली. डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना नेदरलँड विद्यापीठ, नेदरलँडस व डॉ. डी. वाय. पाटील संकुल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी-शिक्षक यांना शैक्षणिकदृष्ट्या आदान-प्रदान कशा प्रकारे करता येईल, या विषयावर चर्चा झाली. 

संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलाची माहिती, वैशिष्ट्ये व विविध घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचे सादरीकरण केले. तसेच तळसंदे येथील कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शेती फार्म यांना भेटी देण्यात आल्या. कृषी शिक्षणामध्ये भारतीय विद्यार्थी कशा प्रकारे नेदरलँड विद्यापीठासोबत काम करतील या विषयीवर प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी सादरीकरण केले.

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज कसबा बावडा या संस्थांना त्यांनी भेटी दिल्या. आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार करून डॉ. डी. वाय.पाटील संकुलातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त मा. ऋतुराज पाटील यांनी प्रा. गर्ट यान डॉइवज यांना आमंत्रित केले होते. 

या भेटीदरम्यान डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू, सौ. डॉ. शिंपा शर्मा, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. सी. पाटील, डॉ. ख्यालाप्पा, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. कुलाली यांनी माहिती दिली. भेटीअंती नेदरलँड विद्यापीठातील शिक्षण प्रणालीवर प्रा. गर्ट यान डॉइवज यांनी सविस्तर सादरीकरण केले. या वेळी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. टी. ए. कादरभाई, एच. आर. हेड साटम, सीएफओ श्रीधरस्वामी, प्राचार्य डॉ. कुलाली, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डॉ. ए. एन. जाधव, प्रा. डी. एन. शेलार,  प्रा. पी. डी. उके व इंजि. ए. बी. गाताडे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com