नेवासा तालुक्यात पावसाने पिके जमीनदोस्त

नेवासा तालुक्‍याच्या पूर्व-दक्षिण भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने दोन-तीन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. पाण्याची आवक कमी झाल्याने भंडारदरा, निळवंडे धरणातून विसर्ग थांबवला आहे.
In Nevasa taluka, rains have destroyed crops
In Nevasa taluka, rains have destroyed crops

नगर ः नगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. नेवासा तालुक्‍याच्या पूर्व-दक्षिण भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने दोन-तीन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. पाण्याची आवक कमी झाल्याने भंडारदरा, निळवंडे धरणातून विसर्ग थांबवला आहे. मुळा धरणातून आज सकाळी तीन हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता.

जिल्ह्यात चांगल्या पावसाने पिकांची स्थिती चांगली असली तरी आता जास्ती पाऊस होऊ लागल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. नेवासा तालुक्यातील उसाचे आगार समजले जाणाऱ्या तेलकुडगाव, देवसडे, चिलेखनवाडी, जेऊर हैबती, देडगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने ऊसासह शेतपिकांचे नुकसान झाले. जेऊर हैबती, देवसडे, देडगाव या भागात कपाशीसह केळीची झाडे पडली आहेत. उसाचे पीक भुईसपाट झाले.

जिल्ह्यामधील जवळपास सर्व धरणे भरली आहेत. मात्र, अकोले तालुक्यातील पश्चिम भागात सुरू असलेला जोरदार पाऊस पूर्णतः थांबला आहे. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे धरणात पाण्याची होणारी आवक थांबली असल्याने दोन्ही धरणांतून होणारा विसर्गही थांबवला आहे. भंडारदऱ्यात सध्या शंभर टक्के, निळवंडेत ९४ टक्के पाणीसाठा आहे. पाणलोटात पाऊस थांबल्याने मुळातही केवळ ९७७ क्युसेकने आवक सुरू आहे.

मुळा धरणातून आज सकाळी तीन हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. दरम्यान नगर जिल्ह्यामधील चाळीस महसूल मंडळांत रविवारी रात्री हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. नगर तालुक्यातील नागापूर महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com